Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा

Crime News : वैवाहिक संकेतस्थळाद्वारे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. विवाहाचे आमिष दाखवून तरूणींवर लौंगिक अत्याचार करायचा अन् त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आलेय.
Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा
crimeSaam tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Crime News Update : साठ वर्षांपूर्वी ‘तो मी नव्हेच’ या नाटकाने राज्यातील समाजमनाला हादरवले होते. लखोबा न्यायालयात हजर होऊनही धादांत खोटं बोलला. त्यानंतर राज्यात असे अनेक लखोबा समोर आले. आता लखोबांनी फसवणुकीचे आयुध तेवढी बदलली आहे. आजच्या हायटेक जमान्यात महिलांना भुरळ पाडण्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर केलाय. पुण्यात एका लखोबा लोखंडेला बेड्या ठोकल्या आहेत. महिलांना फसवणूक करणाऱ्या तरूणाला लग्नाचे आमिष दाखवून फसवायचा. त्यांना ब्लॅकमेल करायचा.

पुण्यात वैवाहिक संकेतस्थळाद्वारे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ आणि इंदूरमधील तरुणींचीही फसवणूक केल्याचं तपासात समोर आलेय. वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करायचा. त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली.

Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा
Pune GBS : पुण्यात जीबीएसच्या रूग्णांची संख्या १८० वर, २२ जण व्हेंटिलेटरवर

या तरुणावर यापूर्वी दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ आणि इंदूरमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा
Yavatmal Crime: धक्कादायक! आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; १६ वर्षांची मुलगी राहिली गरोदर

अमन वर्मा मूळचा जम्मू काश्मीरमधील आहे. त्याने एका संकेतस्थळावर बनावट आयडी तयार करून नोंदणी केली होती. या माध्यमातून तो तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत होता.त्याने हडपसरमधील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मैत्री केली. आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, त्या तरुणीकडून ऑनलाइन ४५ लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्न न करता तरुणीची फसवणूक करून तो पसार झाला.

याबाबत तरुणीने तक्रार दिल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तपासादरम्यान तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने अमनला इंदूर परिसरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शारीरिक संबंध ठेवून तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात समोर आलेय.

Pune : पुण्यात लखोबा लोखंडेला बेड्या, प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल करायचा
Crime : शिक्षकच भक्षक ठरले! ३ जणांनी शाळकरी मुलीवर केला सामूहिक बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com