Devendra Fadnavis Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : 'दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांनी घरे फोडण्याचे लायसन्स घ्यावे'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Latest Speech : दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांनी आता घरे फोडण्याचे लायसन्स घ्यावं, अशा शब्दात ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

संदीप नागरे

Uddhav Thackeray Speech :

'मी पुन्हा येईन म्हणालो होतो, नुसताच आलो नाही तर दोन पक्ष फोडून आलो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर हिंगोलीच्या वसमत येथील सभेत जोरदार निशाणा साधला आहे. दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांनी आता घरे फोडण्याचे लायसन्स घ्यावं, अशा शब्दात ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. भाजपचा 'मोदी सरकार रथ' गावात आला तर पोलीस कार्यवाही झाली पाहिजे. पोलीस कार्यवाही करत नसतील, तर तुम्ही तो रथ आडवा करा.

२. हिंगोली आणि परभणी मतदारसंघ जिंकायचा आहे. परभणीच्या संजय जाधव यांचे कौतुक करतो. मी हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राला मंजुरी दिली होती.

३. त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला. शरद पवार यांचा पक्ष चोरला. आता म्हणत आहे की, आम्ही दोन पक्ष फोडले. आता तुम्ही घरफोडे आहात. तुम्ही घरे फोडण्याचे लायसन्स घेऊन टाका.

४. लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकणारच. पन्नास खोके सारखा आता अबकी बार भाजपा तडीपार हा नारा पण फेमस झाला आहे.

५. मोदी म्हणाले आहेत, 2047 पर्यंत आम्हीच येऊ, पण 2047 पर्यंत पण तुम्ही पुन्हा निवडून येणार नाहीत.

उद्धव ठाकरेंकडून भाजपला प्रत्युत्तर

मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर पार पडलेल्या या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ऐवजी देशभक्तांनो असे शब्द वापरले होते. यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली अशी टीका केली होती. त्याला आता हिंगोलीच्या वसमतमधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. मला आता देश वाचवायचा आहे. त्यामुळे देशभक्तांनो म्हटलो आहे. भाजपचे लोक देशभक्त नाहीत का, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT