BJP Candidate: उदयनराजे भाेसले पक्षाची गरज; भाजप नेते गिरीश महाजनांनी सातारा लाेकसभा मतदारसंघाचा उमेदवारही सांगितला

Satara Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सातत्याने सातारा लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे असल्याचा दावा करीत आहे. यामुळे महायुतीत साता-याच्या उमेदवारीचा तिढा वाढला आहे.
bjp leader girish mahajan assures mp udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituency
bjp leader girish mahajan assures mp udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituencysaam tv

Girish Mahajan Latest Marathi News :

सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांची उमेदवारी डावलण्याचा विषयच येत नाही. त्यांचा आम्हांला लाेकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) राज्यभरात निवडणुकीसाठी कसा उपयोग होईल याबाबत चर्चा करण्यासाठी आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन (bjp leader girish mahajan) यांनी दिली. उदयनराजे भाेसले यांची उमेदवारी ही पक्षाची गरज असल्याचे भाजप नेते महाजन यांनी जलमंदिर पॅलेस (jal mandir palace satara) येथे माध्यमांंशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज (साेमवार) खासदार उदयनराजे भाेसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतली. या दाेन्ही नेत्यांमध्ये आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीविषयी चर्चा झाली. या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (mla shivendraraje bhosale) यांची सुरुची बंगला येेथे भेट घेत लाेकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.

bjp leader girish mahajan assures mp udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituency
राजू शेट्टींनी भाजपला बाहेरून पाठिंबा मागितला; शिवसेना खासदार धैर्यशील मानेंचा गौप्यस्फोट

जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी बाेलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले उदयनराजे भाेसले यांनी उमेदवारी मागण्याची देखील गरज नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपला त्यांच्या उमेदवारीची गरज आहे. महायुतीत तीन पक्ष असल्याने चर्चा सुरू असल्याने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

महायुतीत तीन पक्ष असल्याने चर्चा सुरू असल्याने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत आहे असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com