- रणजीत माजगावकर
राजू शेट्टी (raju shetti) हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते आहेत. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी (mahavikas aghadi) आणि महायुती (mahayuti) या दोन्ही दगडांवर हात ठेवला आहे. त्यांचं हे कारस्थान जनतेने ओळखले आहे. जनता राजू शेट्टी यांना पुन्हा नाकारणार अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (shivsena mp dhairyasheel mane) यांनी साम टीव्हीशी बोलताना शेट्टींविषयी केली. (Maharashtra News)
लाेकसभा निवडणुकीत (lok sabha election 2024) हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (hatkanangle lok sabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत नुकतेच एकमत झाले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असे कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीमधील महाविकास आघाडीच्या बैठकीत सूर हाेता.
त्यावेळी शेट्टी सोबत आले तर ठीक अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (uddhav balasaheb thackeray shivsena) हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असा निर्धार करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांना तयारी लागण्याची सूचनाही केली. (Maharashtra lok sabha election 2024)
आज ठाकरे गटाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टीं यांनी दोन्ही दगडांवर (महाविकास आघाडी आणि महायुती) हात ठेवल्याचे म्हटले. भाजपने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, मी निवडून आलो की तुमचाच असा शब्द राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजू शेट्टी यांचे कारस्थान जनतेने ओळखले आहे. राजू शेट्टी यांना पुन्हा मतदार नाकारतील आण 1 हजार 1 टक्के पुन्हा मी खासदार होणार असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. (Lok Sabha Election Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.