Uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Jalgaon Speech: सभेत घुसणार? अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत; उद्धव ठाकरेंचा जळगावमधील पाचोऱ्यात एल्गार

Uddhav Thackeray Speech: 'सभेत घुसणार? अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.

Vishal Gangurde

Uddhav thackeray News: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेबाबत शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं होतं. त्यावर ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिल होतं. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सभेत घुसणार? अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोऱ्यात जंगी सभा सुरू आहे. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, 'पाकिस्तानला जरी विचारलं तरी पाकिस्तान देखील सांगेल, शिवसेना कुणाची आहे. पण तुमच्याकडे काही लोकांना मोतीबिंदू झाला आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा सर्व बघतोय. काही जणांना असं वाटलं होतं की तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार? अशा घुशी खूप आम्ही पाहिल्या आहेत . पण निवडणुकीमध्ये अशा घुशी गुंडाळून टाकू. चाळीस गद्दार हरामखोर गेले तरी काही फरक पडत नाही'.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'चांगलं पीक आल्यानंतर देखील त्याला कीड लागली तर मारण्याची औषध त्यांनी तयार करून ठेवली आहे. यांना जसं घोड्यावर चढवलं तसं त्यांना आता खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून तुम्ही दिलं आणि ते गद्दार झाले आहे. निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला, तो कलंक तर धुवायचा आहे. मात्र, या कलम कला यांनी हातभार लावला तर हा देखील आपल्याला तोडायचे आहेत'.

'आपलं सरकार होतं, त्यावेळेस कोरोना हे जागतिक संकट होतं, नैसर्गिक नव्हतं. ज्यावेळी नैसर्गिक संकट आलं, त्यावेळेस आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. पण हे उलट्या पायाचे सरकार, काही नैसर्गिक संकटात यांनी मदत केली असेल तर मला सांगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'खरं बोललं तर त्याच्यामागे पोलिसांना लावतात. मला पोलिसांना सांगायचे तुम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहात. शेतकऱ्यांनी त्यांची वेदना शब्दांकन करून टाहो फोडला तर लगेच तुम्ही कारवाई करतात. बहिणाबाई जरा आज असत्या, तर या सरकारने त्यांना देखील तुरुंगात टाकलं असतं, अशी टीका ठाकरे यांनी केली.

'काही लोक बाप बदलतात यांनी तर बाप चोरला. तुमच्या मेहनतीचं रक्त पिऊन फुगलेली ही ढेकणं आहे. एकूण मारायला फक्त एक बोट पुरेसे आहे. आज माझ्याकडे काही नाही. तरीदेखील तुम्ही आज माझ्यासोबत आहात, हे लाखो करोडो हात माझ्या सोबत आहेत. कुणाची हिम्मत आहे मला हात लावायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला.

'भाजप हे माझ्यासाठी आव्हान नाही. पण जोपर्यंत केंद्र आणि राज्यात भाजप सरकार आहे ते असेपर्यंत माझ्या राज्याचे माझ्या देशाचा किती नुकसान करेल हे माझ्यासमोर आव्हान असेल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

SCROLL FOR NEXT