
Political News : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा होण्याआधी राजकारण चांगलच तापलं. गुलाबरव पाटील समर्थकांनी ही सभा उधळून लावण्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला होता. अशात आता या सभेतून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर खरमरीत टीका केली आहे. (Political News)
पाचोरा येथीस या सुवर्ण नगरीत काही दगड निपजले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार. यासाठी छातीत हिंमत लागते. हे गद्दारांच काम नाही. शिवसेनेच्या नादाला लागू नका. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना गद्दारांसाठी केली नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान, हिंदूत्व, कडवटपणा, ताठ कणा यासाठी स्थापन केली. तुम्ही माती खात असाल पण अजूनही लाखो शिवसैनीक शिवसेनेशी इमान राखून आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
गुलाबराव पाटलांच्या विधानांवर बोलताना राऊत म्हणाले की, जळगावमध्ये गुलाबो गँग स्थापन झाली. गुलाबो गँगला २०० कोटींनी लुटले.अलिकडच्या राजकारणात पुतण्यांनी फार घोटाळा केला आहे. हा घोटाळा आपल्याला दुरुस्त करायचा आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच जळगाववर लोकसभा किंवा विधानसभेत शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.