jalgan news
jalgan newsSaam tv

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

. उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे
Published on

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात सभा आहे. या सभेपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. याच सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचं दृश्य समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाकडे गेले आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधांत सभेचा धडाका लावला आहे.

 jalgan news
Sharad Pawar On BJP Politics: 'कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर...', शरद पवारांनी थेट इशारा देत सांगितली रणनीती

ठाकरे गटाने याआधी कोकण, मुंबई आणि इतर भागातही सभा घेतल्या आहे. आज ठाकरे गटाने जळगावमधील पाचोऱ्यात सभेचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

या सभेआधी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आम्ही दगड मारून आंदोलन आणि सभा बंद करणारे लोक आहोत, अशा इशारा दिला होता. यावरून ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

 jalgan news
Ramdas Athawale : तरुण व्हायचंय तर ही आयडीया वापरा; आठवलेंचा अजब उपाय

याचदरम्यान, ठाकरे गटाच्या या सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचे दृश्य समोर आलं आहे. ठाकरे गटाच्या रिकाम्या खुर्च्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही वेळातच उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यात सभा संपन्न होणार आहे.

या सभेची संपूर्ण तयारी झाली असून ठाकरे कुणावर काय-काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आहे. सभेसाठी उद्धव ठाकरे देखील पाचोऱ्यात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com