Pune News : राज्याच्या राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वेगवेगळ्या वक्तव्यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. अशात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आपल्या मिश्किल वक्तव्यांनी कायमच सर्वांना हासवत असतात. त्याच्या वक्तव्यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील खळखळून हासतात. अशात आता आठवलेंनी तरुणांच्या फायद्याचं पण अजब असं मिश्किल विधान केलं आहे. (Political News)
प्रत्येकालाच आपण कायम तरुण रहावं असं वाटतं. त्यामुळे सगळेजण यासाठी जीम, डायेट असे प्रयत्न करतता. यावर रामबाण उपाय म्हणजे तरुण व्हायचं असेल तर वडाच्या झाडाखाली जाऊन बसलं पाहिजे, असं मिश्किल वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे. पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सोहळा २०२३ या कार्यक्रमात आठवले बोलत होते.
त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र हशा पिकला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सोहळा कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे यांना मानपत्र प्रदान करत त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सयाजी शिंदे यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान केला.
काय म्हणाले आठवले?
तरुण व्हायचं असेल तर वडाच्या झाडाखाली जाऊन बसलं पाहिजे. अमेरिकेमध्ये पाच पट क्षेत्रफळ आहे पण आपलं पॉप्युलेशन त्यांच्यापेक्षा चारपट आहे. आपल्या इथे वाढलेला पॉप्युलेशन अमेरिकेमध्ये गेलं तर तिकडच्या लोकांचं भलं होईल. अमेरिकेत शिकायला गेलेली पोरं तिकडेच राहतात इकडे येत नाहीत. तिकडेच लग्न करतात त्यांना तिकडचीच हवा लागते. मी शाळेत कॉलेजमध्ये असताना नाटकात काम केले. एक्टिंग करायला मलाही आवडत होतं मला फिल्ममध्ये काम करण्याची आवड होती, असं आठवले यावेळी म्हणाले.
...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात
अजित पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेवरून रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार वरून नाराज दिसत नाहीत आतून नाराज आहेत. ते जर एनडीएमध्ये आले तर भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं भाकीत रामदास आठवलेंनी यावेळी केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.