Crime News In Pune : संतापजनक! पुण्यात तरुणाची महिलेला मारहाण; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Argument over car parking : वादात तरुणाला राग अनावर झाल्याने तो थेट महिलेच्या कानामागे मारतो.
Crime News In Pune
Crime News In PuneSaam TV

Pune Crime News : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे कार पार्कींगच्या कारणावरून एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. सदर मारहाणीचा व्हिडिओ येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गाडी पार्क करण्यासाठी व्यवस्थीत जागा नसल्याने एक तरुण आणि तरुणी या दोघांमध्ये मोठा वाद होतो. वादात तरुणाला राग अनावर झाल्याने तो थेट महिलेच्या कानामागे मारतो. महिलेला झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Crime News In Pune
Mumbai Street Food : आम्ही खादाड...! मुंबईमधील फेमस स्ट्रीट फूड; एकदा खाल तर बोटं चाटत रहाल

गाडी लावण्याच्या कारणावरून तरुणाने मुलीला मारहाण केली आहे. पुण्यातील साळुंखे विहार सोसायटीतील ही घटना असून दोघेही याच सोसायटीमध्ये राहतात. महिलेला मारहाण केल्यानंतर वाद आणखी वाढला. सोसायटीमधील इतर व्यक्तींसह महिलेने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावयाची सासऱ्याला बांबुने मारहाण

पुण्यातील खेड येथे काही दिवसांपूर्वी एका जावयाने आपल्या सासरऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलीलाही नांदायला घेऊन जा असे सांगत असलेल्‍या सासऱ्याला जावयाने मारले आहे. दरम्यान पतीने पत्नीसह सासरच्या मंडळींना चांगलाच चोप देत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन सासरवाडीतून पळ काढल्याचा प्रकार घडला आहे.

Crime News In Pune
Marathi Actress : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com