झटपट पोट भरण्यासाठी अनेक व्यक्ती फ्रँकीवर ताव मारतात. आपल्याला हवी तशी फ्रँकी लोखंडवाला येथे मिळते. लोखंडवाला येथे मिळणारी फ्रँकी फार स्वादिष्ट आहे.
विलेपार्ले येथे मिळणाऱ्या पावभाजीची बातच और आहे. संपूर्ण मुंबईमधील अनेक व्यक्ती येथील पावभाजी चाखायला येतात. विलेपार्लेमध्ये अमर ज्यूस सेंटर देखील खूप फेमस आहे.
तंदूरी प्रत्येक खवय्याच्या जवळचा विषय. सर्वांनाच विविध प्रकारच्या तंदूरी चाखायला आडतात. जय जवान येथे अनेक प्रकारच्या तंदूरी मिळतात. येथे मिळणाऱ्या तंदूरीची चव फारत चविष्ट आहे.
सायमध्ये आल्यावर येथे मिळणारा छोले समोसा एकदा तरी चाखायला हवा. या समोस्याची खासीयत म्हणजे यात विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. तसेच हा समोसा छोल्यांसह खाल्यास त्याची अप्रतीम चव येते.
मसालेदार, तंदूरी वेज आणि नॉनवेज अशा सर्वच प्रकारच्या बिर्याणी तुम्ही आजवर खाल्या असतील. स्ट्रीट बिर्याणीचे अनेक चाहते आहेत. अनेक व्यक्तींना मसालेदार रंगीबेरंगी बिर्याणी खायला आवडते. मात्र भेंडी बाजारात सफेद बिर्याणी चाखण्यासाठी भलीमोठी रांग लागते.
फेमस स्ट्रीट फूडच्या यादीत ग्रँट रोडवरील बन मस्का आणि मेरवानचा मावा समोसा यांचे नाव हमखास घ्यावे लागेल. द अल्टीमेट मुंबई फेमस फूड म्हणून येथील मेरवानचा मावा समोसा खूप फेमस आहे.
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील खीमा पाव खुप प्रसिद्ध आहे. गुलशन-ए-इराण येथे हा खिमा पाव मिळतो. येथे मिळणारे सर्वच पदार्थ सर्वसान्यांच्या खिशालाही परवडणारे आहेत. रेज गुलशन-ए-इराण येथे खवय्यांची गर्दी उफाळून येते. स्ट्रीट फूडसाठी दिवाने असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.