अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. महायुतीकडून या प्रचारसभेत लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र, याच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर जोरदार घणाघात केला आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि बदलापूर प्रकरणावरून जालन्यातील प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
जालन्यातील प्रचारसभेत महिला सुरक्षा प्रश्नावरून उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपण तिघे भाऊ भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. तुम्हाला लाज लज्जा शरम नावाची बाब थोडीफार राहिली असेल तर पंधराशे रुपये घेऊन बदलापूरला जा. नाही थोबाड फोडल्यास मला विचारा. पुढचं सगळं वाचण्यासाठी आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला,असं तेथील लोक बोलत आहेत'
'आता संपूर्ण महाराष्ट्रात मशाल धगधगत आहे. हे खोके सरकार आहे. मी जनतेच्या न्यायालयात आलो आहे. सरन्यायाधीश आता निवृत्त होत आहेत. गेली दोन वर्ष झाले, तारीख पे तारीख सुरू आहे. आम्हाला निकाल कधी मिळणार आहे की नाही? न्याय म्हणून काही गोष्ट या देशात आहे की नाही? न्यायदेवतला डोळे उघडून बघायला लागत आहे की, देशात लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे. संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाही? राज्यपालांनी बोलावलेलं अधिवेशन बेकायदा होतं हे तुम्हाला माहीत आहे. मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'आज अमित शहा येऊन गेले. माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात. खरंतर पराभवाची गॅरंटी म्हणजे अमित शहा. हा माणूस देशाच्या गृहमंत्रिपदावर राहू शकतो का? औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर कोणी केलं? आपण केलं, हे गद्दार पळाले होते. माझ्यावर टीका करण्याच्या आधी तुमच्या बुडाखाली काय पेंडिंग आहे ते बघा, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे गटावर तोफ डागली.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'सत्तार हजार कोटींचा घोटाळ्याचा अजित पवार यांच्यावर आरोप केला. आता त्यांचा प्रचार करतात. ज्या तोंडाने आरोप केले, त्याच तोंडाने सांगा अजित पवार किती चांगले आहे. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.