परभणी : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, परभणीमधील एका प्रचारसभेत काहींनी भावी मुख्यमंत्री म्हणून हाक मारली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषणातून प्रत्युत्तर दिलं.
परभणीत आल्यावर मला होम पीचवर आल्या सारखं वाटतं. बंडखोरी झाल्यानंतरही राहुल पाटील, संजय जाधव सोबत राहिले. जिल्ह्यातील चार जणांना विजयी करावे लागणार आहे. असे नाही केले तर महाराष्ट्र गेलाच समजा.
मुंबई आपल्या हक्काची आहे. मोदींना आंदन दिली नाही. रक्ताचे पाणी करून मिळाली आहे. सातबाऱ्यावर अदानींचे नाव लागणार नाही. मुंबई आपल्या हक्काची आहे. अदानींना दिलेल्या सुविधा काढून घेणार.
मला भावी मुख्यमंत्री म्हणतात, ठीक आहे. पण मी तुमच्यासाठी लढतोय. त्यांच्याकडे सगळी सत्ता आहे. यंत्रणा आहे. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही.
निवडणूक जवळ आल्यावर फेऱ्या सुरु झाल्या. काल परवापासून पंतप्रधान मोदी, अमित शहा महाराष्ट्रात येतात. राज्यात निवडणुका सुरु आहे. त्यावेळी देशाचा पंतप्रधान फडतूस पक्षाच्या प्रचाराला येतात .
मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. काँग्रेसचे नेते हातात कोरे संविधान घेऊन फिरत असल्याचा आरोप केले जात आहे. ते मी पाहिले आहे.
ज्या वेळेला नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रात भाषण करत होते. तेव्हा मणिपूरमध्ये ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार होत होता. आता ते निर्लज्जपणे मत मागतात.
लोकसभा निवडणुकीत जेपी नड्डा बोलले की, आम्हाला संघाची गरज राहिली नाही.
आम्ही कर्जमुक्ती केली, पण आम्ही जाहिरात केली नाही. या महिलांना विचारा की, योजनेच्या १५०० रुपयांमध्ये घर चालतं का? सोयाबीन भाव पडले. आमच्या बहिणीला १५०० रुपये आणि आमदारांना ५० खोके.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.