Parbhani Tourist Places: मंदिरे,स्मारके अन् बरचं काही परभणीमधील 'या' सुंदर स्थळांना नक्की भेट द्या

Parbhani Tourist Places: महाराष्ट्रतील परभणी शहर त्याच्या सुंदर निसर्गामुळे खूप प्रसिद्ध आहे. या शहराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
parbhani
parbhani goggle
Published On

बाहेरच्या सुंदर वातावरणात आणि निसर्गात फिरायला सर्वानांच आवडत असते. यामुळे प्रत्येक नागरिक स्वत:च्या मन शांतीसाठी जवळची ठिकाणे शोधत असतो. परदेशात जाणे हे प्रत्येकाला शक्य नसते. याबरोबर सुट्टी मिळाली की सर्व पर्यटकांचे वेगवेगळे प्लान तयार होत असतात. अशाच पर्यटकांसाठी आम्ही महाराष्ट्र जिल्ह्यातील परभणी शहराची माहिती घेऊन आलो आहोत.

परभणी शहर महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेले आहे. हे शहर पूर्वी प्रभावतीनगर म्हणून ओळखले जात होते. या शहरात पर्यटकांना अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे. याबरोबर परभणी शहराच्या सुंदर, मनमोहक दृश्यांचा अनुभव घेता येणार आहे. जर तुम्ही सुद्धा परभणी शहराला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. पर्यटक परभणी शहराला एक्सप्लोर सुद्धा करु शकणार आहेत. याबरोबर पर्यटकांसाठी परभणी शहराला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे. नागरिक परभणी शहराला भेट देण्यासाठी तिन्ही मार्गानीं जाऊ शकता. त्याचबरोबर पर्यटकांचा परभणीमधील प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

parbhani
Tourism Lohagad Fort : भय, साहस आणि सुंदरता एकाचवेळी तीन अनुभवांसाठी खास लोहगड; कसं जायचं?

श्री साईबाबा मंदिर, पाथरी

परभणी शहरापासून श्री साईबाबा मंदिर सुमारे ४७ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर पर्यटकांसाठी एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी लाखो भक्त मोठ्या संख्येने येत असतात. याबरोबर पर्यटक मंदिराला भेट देण्यासाठी सकाळी ५:०० ते रात्री ९:०० वेळेत जाऊ शकता. जर तुम्ही सुद्धा परभणी शहराला भेट देणार असाल, तर श्री साईबाबा मंदिराला नक्की भेट द्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

महाराष्ट्रातील परभणी शहरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थित आहे. हे विद्यापीठ परभणी शहरापासून २.४ किलोमीटर अंतरावर आहे. या विद्यापीठाला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री वसंत नाईक यांच्यावरुन नाव देण्यात आले. हे विद्यापीठ १८ मे १९७२ रोजी बांधले गेले आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ संपूर्ण देशभरात एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना संपूर्ण कृषी विज्ञान दिले जाते.

parbhani
Winter Travel : गुलाबी थंडी अन् रोमँटिक वातावरण, पार्टनरसोबत फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन

येलदरी धरण

महाराष्ट्रातील परभणी शहरापासून येलदरी धरण ५८ किमी अंतरावर आहे. हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी नावाच्या गावामुळे प्रसिद्ध आहे. येलदरी धरण पूर्णा नदीवर बांधलेले गेले आहे. येलदरी धरण मराठवाड्यातील सर्वात मोठे दुसरे धरण आहे. लाखो पर्यटक परभणीमधील येलदरी धरणाला भेट द्यायला येत असतात. याबरोबर या धरणाची स्थापना १९६८ मध्ये झाली आहे. येलदरी धरणाला भेट देण्याचा उत्तम वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ७:०० आहे. पर्यटकांसाठी येलदरी धरणाला भेट देण्याचा योग्य काळ नोव्हेंबर ते मार्च आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक

महाराष्ट्रातील परभणी शहरापासून मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक फक्त ७०० किलो मीटर अंतरावर आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मुक्ती दिनानिमित्त साजरा केला जातो. पर्यटकांना या स्मारकाला भेट दिल्यावर निजामाच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका झाल्याचा इतिहास पाहायला मिळेल. हे स्मारक त्याच्या सभोवताली असणाऱ्या शांततेमुळे सर्वांना आकर्षित करत असते. मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाला भेट देण्याची योग्य वेळ सकाळी ७:३० ते रात्री ८:३० आहे. एक दिवसाच्या पिकनिकसाठी हे स्मारक योग्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

parbhani
Goa Travel : गोव्याजवळील 'हा' Hidden Spot पाहिलात का? हिवाळ्यात भेट द्याच

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com