Ajit Pawar News : खटाखट वाजवायला दरवाजा आहे काय? राहुल गांधींच्या टीकेला अजित पवारांचं 'खटाखट' उत्तर

Ajit Pawar Latest News : राहुल गांधींनी मुंबईत जाहीर केलेल्या योजनेवरून अजित पवारांनी टीका केली आहे. अजित पवारांनी भरसभेत राहुल गांधींची टिंगल उडवली.
Ajit Pawar vs rahul gandhi
Ajit Pawar NewsSaam tv
Published On

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने जाहीर प्रचारसभेत पंचसूत्रीच्या नावाखाली योजना जाहीर केल्या. मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या जाहीर सभेत महाविकास आघाडीने योजना जाहीर केल्या. यावेळी राहुल गांधी यांनी महिलांना सत्ता आल्यानंतर महालक्ष्मी योजनेअंतर्गत खटाखट खात्यात पैसे जमा होतील, असे वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी टीका केली आहे. खटाखट वाजवायला दरवाजा आहे काय? असा सवाल करत अजित पवारांनी टीका केली.

अजित पवार यांच्या भाषणाताली मुद्दे

राज्य सरकारच्या योजनेवरून भाष्य करताना अजित पवार म्हणाले,'तुम्हाला योजनेचे पैसे दिले, यामुळे विरोधक टीका करतात. आम्ही काय मूर्ख आहेत का? आता निवडून येणार नाही. त्यामुळे असं काही सांगायचे की लोक बावळून गेली पाहिजेत. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की, त्यांचा सगळा चुनावी जुमला चालू आहे. आपल्या राज्याचे वाटोळं करण्याचे काम चालले आहे'.

Ajit Pawar vs rahul gandhi
Yugendra Pawar Vs Ajit Pawar : बारामतीमध्ये पवारांचे शक्तीप्रदर्शन, नातवासाठी शरद पवार मैदानात, काका-पुतणे भरणार अर्ज!

अजित पवारांनी यावेळी राहुल गांधींची टिंगल उडवली. अजित पवार म्हणाले, 'काल काँग्रेसचे एक दिल्लीतले नेते आले. त्यांनी सांगितले आम्ही खटाखट देतो. अरे कुठलं खटाखट? अरे दरवाजा वाजवताय का? खटखट वाजवायला? असं कुठे नोटा येतात का? अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते आहात'.

Ajit Pawar vs rahul gandhi
Rahul Gandhi News : राहुल गांधींची संविधानासह महाराष्ट्रात एन्ट्री; आरक्षणाबाबत दिली मोठी गॅरंटी

'आम्हाला बनवता? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? आम्ही स्पष्ट बोलणारे आहोत. खऱ्या गोष्टी सांगणारे आहोत. योजना पूर्ण करण्याचे धमक आणि ताकत लोकप्रतिनिधींमध्ये असावी लागते. राष्ट्रवादी घडाळ्याला मत द्या,इस्लामपूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा पाच वर्षात बदलला नाही,तर नावाचा अजित पवार सांगणार नाही, असे ते म्हणाले.

Ajit Pawar vs rahul gandhi
Lakhpati Didi Yojana: महिला लखपती होणार! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com