uddhav balasaheb thackeray shiv sena to contest hatkanangale lok sabha constituency saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरात इंडिया आघाडीची बैठक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी झाला महत्त्वपूर्ण निर्णय, राजू शेट्टींचं काय?

India Alliance : इंडिया आघाडीच्या बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

लाेकसभा निवडणुकीसाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीमधील महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर (hatkanangle lok sabha constituency) मविआच्या नेत्यांनी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) सोबत आले तर ठीक अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (uddhav balasaheb thackeray shivsena) हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असे निश्चित करण्यात आले. यामुळे राजू शेट्टी आता काय निर्णय घेताहेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra News)

लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात इंडिया आघाडीची आज कोल्हापुरात व्ही बी पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. इंडिया आघाडीच्या बैठकीला आमदार जयंत पाटील (mla jayant patil), आमदार सतेज पाटील (mla satej patil), आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह इंडिया आघाडी घटक पक्षातील नेते उपस्थित हाेते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देण्यासाठी इंडिया आघाडीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. शेट्टी हे आपल्या समवेत आले नाही तर ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लढवेल असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप उमेदवार काेण असणार हे अद्याप निश्चित केले नाही. परंतु मातोश्री वरून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT