Mangalvedha Sinchan Yojana: माेठी बातमी! मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर, कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा

Mangalvedha Sinchan Yojana News in Marathi: आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णायाचे मंगळवेढा ग्रामस्थांसह अन्य गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले.
Mangalvedha UPSA Sinchan Yojana Approved Today by Maharashtra Government
Mangalvedha UPSA Sinchan Yojana Approved Today by Maharashtra Governmentsaam tv

Pandharpur News:

गेल्या 50 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य सरकराने मंजूरी दिली आहे. आज (बुधवार) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंगऴवेढा उपसा सिंचन याेजनेला (mangalvedha sinchan yojana) मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना आमदार समाधान आवताडे (mla samadhan autade) यांनी व्यक्त केली. (Maharashtra News)

आचारसंहितेपूर्वी (code of conduct) मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी द्या अन्यथा लोकसभा निवडणुकीवर (loksabha election 2024) बहिष्कार टाकू असा इशारा राज्य आणि केंद्र सरकराला मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी भाग असलेल्या 24 गावातील शेतकरी, ग्रामस्थांनी नुकताच दिला हाेता. या ग्रामस्थांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्याचे देखील निश्चित केले हाेते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील शुक्रवारी भेटण्यासाठीची वेळ ग्रामस्थांना दिली हाेती.

Mangalvedha UPSA Sinchan Yojana Approved Today by Maharashtra Government
Lok Sabha Election 2024 : तुमच्यात निवडणूक लढविण्याचा दम नाही का? खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना डिवचलं

दरम्यान आज राज्य मंत्रीमंडळाने मंगळवेढा उपसा सिंचन याेेजनेला मंजूरी दिली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णायमुळे कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Mangalvedha UPSA Sinchan Yojana Approved Today by Maharashtra Government
Bhandara : शेतकऱ्यांचे पैसे अडवले तर याद राखा!; भाजप खासदार सुनील मेंढेंनी सरकारी अधिकाऱ्याला धरलं धारेवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com