Uddhav Thackeray Big Message Saam TV news
महाराष्ट्र

Thackeray: '..म्हणून आम्ही एकत्र आलो'; राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

Uddhav and Raj Thackeray Unity: २० वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनात त्यांनी हजेरी लावत मराठी अस्मिता, धारावी आणि आदानी प्रकल्पावर ठाम भूमिका मांडली.

Bhagyashree Kamble

सध्या राज्यात विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाने पेट घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू असून, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरेही आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. तसेच विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. केवळ शिक्षकांच्या मागण्या नव्हे तर, मराठी अस्मितेचा मुद्दा आणि राज - उद्धव ठाकरे एकत्र का आले? यावरही त्यांनी भाष्य केलंय.

१६०० एकर मुंबईची जागा अदानीच्या घशात टाकली

उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान धारावी आणि अदानीचा मुद्दा उपस्थित केला, 'विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढण्यात येत आहे. आजपर्यंत धारावीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. मात्र, आता धारावी अदानीच्या घशात घातली. १६०० एकर मुंबईची जागा अदानीच्या घशात टाकलीय', असा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

यावेळी त्यांनी गिरणी कामगारांचाही मुद्दा उपस्थित केला. 'आज गिरणी कामगारांची दुसरी - तिसरी पिढी आहे. पूर्वीच्या काळी संप झाला. जे काही ठरलं होतं, ते गिरणी कामगारांना मिळालं नाही. कामगारांच्या उरावर टॉवर उभं केलंय. गिरणी कामगारांना धारावी आणि मदर डेअरीच्या जागी जागा द्या. अदानीला टॉवर शेलू वांगणीला बांधू द्या. देवनार डंपिंगवर त्यांना बांधू द्या', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच 'गिरणी कामगार, पोलीस आणि सफाई कामगारांना हक्काची जागा द्या, ज्यांच्यामुळे मुंबई आहे, त्यांना हक्काची जागा द्या', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

नतद्रष्टासारखे भांडत बसू का?

'आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. पण नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू आहोत. माझे आजोबा, बाबा आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघंही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आमच्या डोळ्यात देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही नतद्रष्टासारखं भांडत बसू का? आम्ही आमच्यातील भांडणं मिटवून टाकली..' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchdhatu Ring: पंचधातू अंगठी वापरल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Kapil Show: मी माझ्या बायको आणि गर्लफ्रेंडसोबत...; कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यामुळे संजय दत्त आणि सुनील शेट्टी आवाक

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

SCROLL FOR NEXT