छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केली जातायत..त्याविरोधात कायदा करण्याची मागणी करत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकार बोळ्यानं दूध पितं का? असा सवाल करत सरकारला घरचा आहेर दिलाय.....त्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... विजय वडेट्टीवारांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केलाय...
कायदा करण्याबाबत सरकार बोळ्यानं दूध पितं का? असा सवाल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. उदयनराजे बोलतात तसं काहीही करु शकतात, असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे असं असलं तरी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यावर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रीया दिली होती.. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया देत उदयनराजेंचा संताप योग्य असल्याचं म्हटलंय.
भाजपचेच खासदार असलेल्या उदयनराजेंनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यासाठी खडे बोल सुनावलेयेत... त्यामुळे आतातरी सरकारचे डोळे उघडणार का? आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार कधी कायदा करणार? याकडे लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.