udayanraje bhosale meets political rival ramraje naik nimbalkar in phaltan saam tv
महाराष्ट्र

Udayanraje-Ramraje Meeting : उदयनराजे-रामराजेंचे तुझ्या गळा माझ्या गळा... या भेटीमागे दडलंय काय? (पाहा व्हिडिओ)

satara lok sabha constituency : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे.

ओंकार कदम

Satara News :

सातारा जिल्ह्याला खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांचं राजकीय वैर काही नवीन नाही. परंतु यावर्षी ऐन मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर खासदार उदयनराजेंनी अचानक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमधील (phaltan) निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दाेन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोरदार उधाण आले आहे. (Maharashtra News)

गेल्या काही वर्षांत खासदार उदयनराजे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे यांचा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. उदयनराजे जेव्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात होते तेव्हा त्यांच्या विरोधात एक जिल्ह्यातील आमदारांचा गट काम करत होता. या गटाच्या बांधणीत रामराजेंचा राेल महत्वाचा होता असे त्यावेळी सूत्रांची खात्रीलायक माहिती असायची.

या दोन्ही नेत्यांनी खाजगी चर्चा ते जाहीर व्यासपीठाव सुद्धा एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी केली आहे. परंतु फलटण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis in phaltan) यांची जाहीर सभा झाली.

या सभेनंतर उदयनराजेंनी तडक रामराजेंचे निवासस्थान गाठले. दाेन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. त्यानंतर दाेघांत खूप वेळ बंद दाराआड चर्चा झाली. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे.

खासदार उदयनराजे हे भाजपकडून सातारा लोकसभेचे (satara lok sabha constituency) प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यातच ही भेट म्हणजे कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कानमंत्र दिल्याने उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT