बडवे - उत्पातांच्या जोखडातून पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर मुक्त होवून आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु दहा वर्षानंतर देखील पंढपूरातील (pandharpur latest marathi news) विठ्ठल रूक्मिणी मंदिर (vitthal rukmini mandir pandharpur) शंभर टक्के मुक्त झाले नाही. आज ही जातीयतेची उतरंड मांडणारे पुरूष सुक्त देवापुढे म्हटले जाते. जो पर्यंत मंदिरातील पुरूष सुक्तची आरती बंद होणार नाही, तो पर्यंत मंदिर शंभर टक्के मुक्त झाले असे म्हणता येणार नाही अशी खंत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर (bharat patankar) यांनी आज (बुधवार) व्यक्त केली. (Maharashtra News)
भारत पाटणकर म्हणाले 17 जानेवारी 2014 साली विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे बडवे उत्पात यांच्या ताब्यातून मुक्त झाले. त्यानंतर मंदिराचे व्यवस्थापन हे सरकारकडून केले जाते. 17 जानेवारी हा दिवस विठ्ठल मंदिर मुक्ती दिन साजरा केला जातो.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर मुक्तीसाठी अनेक वर्षे लढा दिला. आजही तो आमचा सुरू आहे. काही लोक आमचा लढा मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयात देखील आम्ही तो लढू. गेल्या दहा वर्षांमध्ये आरती सोडली तर 75 टक्के मंदिर मुक्त झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उतरंडीची आरती बंद करावी अशी आमची मागणी आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचे पाटणकर यांनी नमूद केले. दरम्यान मुक्ती दिनाच्या निमित्ताने आज पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.