यंदा पाऊस पाण्याची कांही कमतरता भासणार नाही. वासरू आल्यापासून नबिथरता अतिशय शांत उभं राहिल्याने यंदाचे वर्ष हे शांततेच असेल. त्यासोबतच वासराने लाल रंगांच्या भाज्यांना केवळ चाटल असल्याने यंदा महागाई वाढणार नसून 'जैसे थे' परिस्थिती राहणार असल्याची भाकणूक (Solapur Siddheshwar Yatra Bhaknuk) साेलापूरात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज (siddarameshwara) यांच्या यात्रेत मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली. (Maharashtra News)
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील 'भाकणूक'ला अनन्यसाधारण महत्व आहे. या भाकणुकीत वर्तवण्यात आलेलं भविष्य खरं ठरत असल्याची अनुभूती आजपर्यंत आलेली आहे. यंदा भाकणुकीत सकारात्मक गोष्टी घडणार असल्याच भाष्य केल गेलं आहे.
यंदाच वर्ष शांततेच
सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरा महत्वाचा विधी 'होम प्रदिपण' पार पडल्यानंतर भकणूक केली जाते. देशमुख घराण्याच मानाचं वासरू या विधीसाठी आज दिवसभर उपाशी ठेवलं जातं. त्याच्यासमोर विविध प्रकारचे धान्य,कडधान्य, भाज्या, फळ ठेवली जातात. या सर्व पदार्थांना हा वासरू चाटतो की खातो यावरून भाकणूक केली जाते.
माध्यमांशी बाेलताना मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले यंदा वासाराने विधीला आल्याबरोबर मल आणि मूत्र विसर्जन केल. त्यामुळे यंदा पाऊस पाण्याची कांही कमी भासणार नाही.तर वासरू आल्यापासून नबिथरता अतिशय शांत उभं असल्याने यंदाच वर्ष हे शांततेच असेल.
राजकीय भाष्य केल जातं नाही
त्यासोबतच वासराने लाल रंगांच्या भाज्यांना केवळ चाटल असल्याने यंदा महागाई वाढणार नसून 'जैसे थे' परिस्थिती राहणार असल्याची भाकणूक वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच यंदाच वर्ष हे निवडणूकांच वर्ष आहे,मात्र या भकणुकीतून कुठलेही राजकीय भाष्य केल जातं नसल्याचं मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी स्पष्ट केल. त्यामुळे यंदाच्या सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक हि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने हिताची असणार आहे.
'होम प्रदिपण सोहळा'
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी होम प्रदीपन विधी पार पडतो. सिद्धरामेश्वरांचा जयघोष करत होम मैदानावर होमप्रदीपनाच्या सोहळा पार पडला. लाखों लोकांच्या उपस्थितीत हा अक्षता सोहळा आणि होम प्रदीपन सोहळा पार पडला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.