CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

'सीएम महाराष्ट्रात कुठूनही निवडून येतील', आदित्य ठाकरेंच्या 'ओपन चॅलेंज' वर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांला विश्वास

Sindhudurg News : त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर देण्याची गरज नाही असा टोलाही नाव न घेता आदित्य ठाकरेंना उदय सामंत यांनी लगावला.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Uday Samant News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणावरुन ते निवडून येतील. मुख्यमंत्र्यांनी 288 मतदारसंघात कुठेही उभे राहावे ते फार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात हे संपुर्ण चित्र महाराष्ट्रात आहे असा विश्वास उद्याेग मंत्री उदय सामंत (uday samant latest news) यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आपल्या समोर निवडणुकीत उभं राहा असे गुरुवारी काेकण दाै-यावर असताना म्हटलं हाेते. त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा देखील साधला.

मंत्री उदय सामंत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी उठल्या पासून अठरा-अठरा, वीस वीस तास काम करतात. त्यांना दिवसातून चार तास काम करणाऱ्या लोकांनी शिकवू नये. वरळी मध्ये घोडा मैदान जवळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर देण्याची गरज नाही असा टोलाही नाव न घेता आदित्य ठाकरेंना (aditya thackeray in kokan) लगावला.

सामंत पुढे बाेलताना म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी ते निवडून येतील. 288 मतदार संघात कुठेही ते उभे राहिले तरी फार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात. हे संपुर्ण चित्र महाराष्ट्रात आहे.

मात्र स्वतःच्या वरळी मतदारसंघात सध्या परिस्थिती काय आहे, बिडीडी चाळीचा प्रश्न असेल, सिलिंक खाली कोळी बांधव आहेत त्यांचा प्रश्न काय आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे असेही ठाकरेंचे नाव घेता सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी सामंत यांनी राज्यातील नागरिकांना गणेशाेत्सवाच्या (ganeshotsav) शुभेच्छा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT