Anil Parab Targets Minister Yogesh Kadam Saam
महाराष्ट्र

'गृहराज्यमंत्र्यांकडून गँगस्टरला शस्त्रपरवाना, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा', शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Anil Parab Targets Minister Yogesh Kadam: पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घावळचा भाऊ सचिन याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला, असा गंभीर आरोप आमदार अनिल परब यांनी केला.

Bhagyashree Kamble

  • योगेश कदमांवर सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप.

  • आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले.

  • कारवाई नाही झाली तर, शिवसैनिक रस्त्यावर उतरणार, परबांचा इशारा.

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बंदुकीचा परवाना दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आलंय. हे प्रकरण समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. विरोधकांकडून योगेश कदम यांच्यावर टिकेचे बाण सोडण्यात आले. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत परब यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळसंदर्भातही खुलासे केले. गँगस्टरला शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी परबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच कारवाई नाही केल्यास, शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही अनिल परबांनी दिला.

पत्रकार परिषदेत परब म्हणाले, 'महाराष्ट्राला वारंवार कलंकित करणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे हळूहळू अनेक कारनामे उघडकीस येत आहे. पुराव्यांसकट प्रकरणं मांडल्यानंतरही मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामागचं कारण काय?', असा सवाल परब यांनी उपस्थित केला.

'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड येथे येऊन योगेश कदम यांना 'मी तुझ्या पाठीशी आहे', असं सांगितलं होतं'. त्यांना एकनाथ शिंदे यांचीही साथ आहे', असं अनिल परब म्हणाले. 'गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी शस्त्रपरवाना नाकारल्यानंतरही कदम यांनी शस्त्र परवाना दिला', असा गंभीर आरोप परब यांनी केला.

सचिन घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न तसेत खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अहवाल दिला होता. मात्र, पुराव्यांअभावी न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले. योगेश कदम यांनी घायवळला शस्त्र परवाना दिला होता. उद्या दाऊद अब्राहिमला न्यायालयाने पुराव्याअभावी सोडलं तर, त्यांनाही शस्त्र परवाना देणार का? असा प्रखर सवालही परब यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richa Ghosh : 4 सेंटीमीटरने केला घात! अवघे 6 रन्स शिल्लक असताना हुकलं शतक; Video पाहून तुम्हीही चुकचुकाल

RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण रुसली! दिवाळी तोंडावर, पण ₹ १५०० मिळेनात!

Maharashtra Live News Update: ..तर सरकारच्या विरोधात जाणार; मंत्री विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

India vs South Africa : भारताच्या स्टार क्रिकेटपटूची हटके कामगिरी; अवघ्या २३ धावा करून २८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT