दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Gold prices hit record: सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला असून, चांदीही महागली आहे. ऐन दिवाळीला खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसणार, एवढं मात्र नक्की.
Gold prices hit record
Gold prices hit recordSaam
Published On
Summary
  • सोन्यानं उच्चांक गाठला.

  • २४ कॅरेट सोनं सव्वा लाखांच्या टप्प्यांवर पोहोचला.

  • चांदीच्या दरातही वाढ.

सोने आणि चांदीच्या दरानं आता नवा टप्पा गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर सव्वा लाखांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. दिवाळी या सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दिवाळीला आपण सोनं हमखास खरेदी करतो. मात्र, वाढत्या सोन्याच्या दरामुळे सोनं खरेदी करावं की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. वाढत्या सोन्याच्या दरामुळे ऐन सणावाराला सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार एवढं मात्र नक्की.

आज ९ ऑक्टोबर २०२५. गुरूवारी सोन्याच्या दरानं नवा टप्पा गाठला आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २२० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२४,१५० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२०० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,४१,५०० रूपये मोजावे लागतील.

Gold prices hit record
IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१३,८०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,३८,००० रूपये मोजावे लागतील.

२४, २२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १६० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९३,११० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १,६०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,३१,१०० रूपये मोजावे लागतील.

Gold prices hit record
अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं; शरीरसंबंध, VIDEO शूट अन् पैशांची मागणी, 'असं' उघडं पडलं महिलेचं पितळ

चांदीच्या दरातही वाढ

सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १ रूपयांची वाढ झाली आहे. १ ग्रॅम खरेदीसाठी १६१ रूपये मोजावे लागतील. तर, एक किलो चांदी खरेदीसाठी १,६१,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com