म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

MHADA to Sell Unsold Flats: म्हाडाच्या मुंबईतील ताडदेव परिसरातील ४ आलिशान घरे विक्रीविना पडून आहेत. म्हाडा या घरांची थेट विक्री करणार, अथवा भाड्यानं देण्याच्या तयारीत.
MHADA news
MhadaSaam tv
Published On
Summary
  • म्हाडाची ताडदेव परिसरातील ४ घरे विक्रीविना पडून.

  • ओपन टु ऑलनुसार म्हाडा घरे विकणार.

  • घरांची विक्री न झाल्यास भाड्यानं देण्याचा विचार.

मुंबईत स्वत: चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, वाढत्या किंमतीमुळे प्राईम लोकशनवर घर घेणं काहींना शक्य होत नाही. सामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा अल्पदरात घरांच्या विक्रीसाठी लॉटरी प्रणाली राबवत असते. सोडतीनुसार, सामान्यांना प्राईम लोकेशनवर घर मिळते. काहींना लॉटरीतून घर मिळते. तर, काहींच्या पदरी निराशा पडते. मात्र, आता म्हाडाच्या घरांसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाकडून घरांची थेट विक्री केली जाणार आहे. तसेच काही घरे भाड्यानेही दिली जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील म्हाडाच्या काही घरांना अल्पप्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे म्हाडाची ही घरे विक्रीविना पडून आहेत. या जागेवर म्हाडानं २ वेळा लॉटरी काढली. तरीही ग्राहकांकडून अल्पप्रतिसाद मिळत असल्यामुळे म्हाडानं या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडा आता या घरांची थेट विक्री करणार आहे. तसेच तरीही ग्राहक नाही मिळाले तरीही भाड्याने दिली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

MHADA news
'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन् माझी हो..' प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, 'नको तिथे स्पर्श' करत लैंगिक अत्याचार

ओपन टू ऑलनुसार म्हाडाकडून घरांची विक्री

मुंबईतील ताडदेव परिसरातील म्हाडाच्या आलिशान इमारतीत ४ फ्लॅट्स अद्याप विक्रीविना आहेत. प्रत्येकी घरांची किंमत ६ ते ७ कोटी रूपयांच्या दरम्यान आहे. घरांची किंमत जास्त असल्यामुळे नागरिकांनी या घरांकडे पाठ फिरवली. त्यामुळे म्हाडानं ओपन टू ऑलनुसार ही घरे थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली.

MHADA news
गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घरे ठराविक प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण जास्त किंमत असल्यामुळे ही घरे विक्रीविना पडून आहेत. आता ही घरे म्हाडा ओपन टू ऑलनुसार विक्री कऱणार आहे. जर, तरीही ही घरे विकली गेली नाहीत तर, म्हाडाकडून ही घरे भाड्यानं दिली जातील, असा निर्णय म्हाडा घेण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com