गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Minor Lovers Found Dead in Well: यवतमाळमध्ये शेतातील विहिरीत अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरूवात कली.
Minor Lovers Found Dead in Well
Minor Lovers Found Dead in WellSaam Tv
Published On
Summary
  • विहिरीत अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा आढळला मृतदेह.

  • दोघेही ५ ऑक्टोबरपासून बेपत्ता.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेत शिवारातील विहिरीत अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केला. दरम्यान, प्रेमसंबंधातून दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातून उघडकीस आली आहे. जुनोनी शेत शिवारात एक जूनी विहीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांना या विहिरीत अल्पवयीन प्रेमीयुगुलांचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिकांना दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने गावातील इतरांना याची माहिती दिली.

Minor Lovers Found Dead in Well
IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

गावकऱ्यांना या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. घाटांची पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. तसेच पंचनामा केला. दरम्यान, प्रेमीयुगुल ५ ऑक्टोबरपासून घरातून बेपत्ता असल्याचं समोर आलं. दोन दिवसानंतरही मुलगी सापडली नसल्यामुळे मुलीच्या बापानं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Minor Lovers Found Dead in Well
मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार अन् शिवसेनेला धक्का, भाजपची ताकद वाढली

तसेच मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. नंतर दोघांचेही मृतदेह विहिरीत पाण्यात तरंगताना आढळले. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com