मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार अन् शिवसेनेला धक्का, भाजपची ताकद वाढली

Parbhani Political Shakeup: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीत राजकीय उलथापालथ. भाजपची ताकद वाढली.
Parbhani Political Shakeup
Parbhani Political ShakeupSaam
Published On
Summary
  • परभणीत भाजपची ताकद वाढली.

  • भाजपात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची एन्ट्री.

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच परभणीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडले आहे. प्रमुख नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट कमळ हाती घेतल्यामुळे परभणीत भाजपची ताकद वाढली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, अविनाश काळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन निकम, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बोरी राजेंद्र नागरे, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Parbhani Political Shakeup
सलमानला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं; पनवेलमध्ये गुन्हा करून फरार, आरोपीचे कल्याणमध्ये मुसक्या आवळल्या

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी आमदार विजय भांबळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. भांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर जिंतूर तालुक्यातील काही राष्ट्रवादी पदाधिकारी नाराज होते. नाराज पदाधिकारी पक्ष सोडतील अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं या पक्षप्रवेशामुळे पाहायला मिळत आहे.

Parbhani Political Shakeup
अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवलं; शरीरसंबंध, VIDEO शूट अन् पैशांची मागणी, 'असं' उघडं पडलं महिलेचं पितळ

या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाला फटका बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यात १०० टक्के भाजप करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्या पक्षवाढीसाठी झटत असल्याचं कायम दिसून आलं आहे. भाजप येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा पक्षप्रवेश झाल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com