यवतमाळ जिल्ह्यात टाइफॉइड, निमोनिया आजाराचे थैमान; रूग्णांना मिळेना बेड! SaamTvNews
महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यात टाइफॉइड, निमोनिया आजाराचे थैमान; रूग्णांना मिळेना बेड!

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात २ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये टाइफॉइड आणि निमोनिया या आजाराची लक्षणं आढळून येत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : कडक उन्हामुळे तापमानाचा पारा ४२ सेल्सिअसच्या वर जात आहे. परिणामी लहान मुलांपासून ते जेष्ठापर्यंत याचा जोरदार फटका बसल्याने जिकडे तिकडे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे (Temperature) निमोनिया, टाइफॉइड आदी आजाराने लहान मुले फनफन करत आहेत. सरकारीसह खाजगी रूग्णालयात उपचाराकरिता मोठी गर्दी होताना दिसतेय.

हे देखील पहा :

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात २ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये टाइफॉइड आणि निमोनिया या आजाराची लक्षणं आढळून येत असल्याने सगळीकडे रूग्णालय हाऊसफूल झाल्याचे दृष्य आहे. लहान मुलांना टाइफॉइड (Typhoid) आणि निमोनियामुळे (Pneumonia) तीव्र स्वरूपाचा ताप, अंग दुःखी, डोकेदुखी, खोकला अशी लक्षणे दिसून येत असल्याने शासकीय सह खाजगी रूग्णालयात प्रचंड गर्दी होतांना दिसतेय.

लहान मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिक आधी खाजगी रूग्णालयात (Hospital) धाव घेतायत. सर्वात आधी रक्त तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या जाते. लहानमुलांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी रूग्णालयातील स्टाॅपला मोठी कसरत करावी लागत असल्याने लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजामुळे अक्षरशः आई-वडिलांचा डोळ्यात या दरम्यान अश्रू येत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दिसून येत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT