कलाकारी २०२२ : शब्द, सूर, रंग, मातीचा आविष्कार सातारकरांना अनुभवायला मिळणार

शाहुनगरीत नव्याने सुरु होत असलेल्या सांस्कृतिक चळवळीचा हिस्सा होण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन भारती फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.
art
artsaam tv
Published On

सातारा : गेल्या काही वर्षांपासून साता-याचे (satara) सांस्कृतिक आणि कला क्षेत्र विस्तारत आहे. परंतु दोन्ही क्षेत्रातील कलाकार एकत्र एकाच मंचावर अभावाने आलेले आढळतील. सांस्कृतिक (cultural) आणि कला (art) क्षेत्रातील कलाकार एकाच मंचावर आणणे हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेवून साता-यातील भारती फाउंडेशनच्यावतीने कलाकारी २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शब्द, सूर, रंग व मातीचा उत्स्फूर्त आविष्कार सातारकरांना अनुभवायला मिळणार आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम येथील शाहू उद्यान ( गुरुवार बाग) येथे रविवारी (ता.१० एप्रिल) सकाळी आठ ते ११ यावेळेत होणार असल्याची माहिती भारती फाउंडेशनचे प्रमुख रविंद्र भारती-झुटींग यांनी दिली. (satara latest marathi news)

झुटींग म्हणाले साता-याच्या सांस्कृतिक क्षेत्रात जास्त काही घडत नाही अशी अनेक कलारसिक सातारकरांची एक नेहमीची तक्रार असते आणि यात तसे पाहता तथ्यही आहे. कलाक्षेत्रात साता-याच्या आसपासच्या पुणे-कोल्हापूर सारख्या शहरांचे जेवढे नाव आहे, दुर्देवाने तेवढे साता-याचे आढळत नाही. आता याचा अर्थ साता-यात कलाकर किंवा कलारसिक नाहीयेत असा अजिबात होत नाही पण एकाच मंचावर हे दोघे येतील असे कार्यक्रम साता-यात आयोजित झालेले फारसे आढळत नाहीत.

साता-याच्या सांस्कृतिक विश्वातील हीच पोकळी भरुन काढण्यासाठी भारती फाउंडेशन यांच्यातर्फे एक नवीन संकल्पना म्हणजे कलाकारी २०२२ हा उपक्रम हाती घेतला आहे. साता-यातील मध्यवर्ती निसर्गरम्य अशा गुरुवार बागेत कलाकार व कलारसिक एकत्र येतील. याठिकाणी असेल कान तृप्त करणारी एक शास्त्रीय गाण्यांची (song) छोटीशी मैफील.

या कलाकारी २०२२ चे उदघाटन ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्याहस्ते होणार असून यावेळी कन्याशाळेचे उपप्राचार्य चंद्रकांत ढाणे, संगीत शिक्षिका वर्षा जोशी यांची उपस्थिती असणार आहे.

art
Maharashtra Kesari: बाला रफिकचा पराभव; दिग्गज मल्लांत आज उपांत्य फेरीची लढत

कलाकारी २०२२ मध्ये आपल्या कला कौशल्याची चुणूक दाखवणारे गणेश कोकरे – व्यक्तीचित्र, सिध्दांत पिसाळ- व्यक्तीचित्र (पेन्सिल), सम्राट कांबळे – निसर्गचित्र, मंदार लोहार- शिल्पकला, अंकिता पवार- कॅलिग्राफी, ॠषिकेश उपळावीकर- व्यंगचित्र, शंकर कुंभार- पॉटरी, मिथाली लोहार-शास्त्रीय गायन, दीपाली गायकवाड- शास्त्रीय गायन, कल्याणी गायकवाड- शास्त्रीय गायन, अन्सार इनामदार- बासरी वादन, प्रणव पित्रे-तबला हे उदयोन्मुख कलाकार सहभागी होणार आहेत.

या सर्व कलाकारांच्या सोबतील असेल साता-यातील एक ख्यातनाम फोटोग्राफर दिलीप भोजने यांनी शास्त्रीय गायकांच्या केलेल्या फोटोग्राफीची एक अनोखी एक्झिबिशन गॅलरी व साहित्यरसिकांसाठी असतील पुस्तकांचे स्टॉल्स सुध्दा. त्यामुळे सातारकरांना असेल रंग, माती, शब्द व सूर यांचा एक घडणारा अनोखा संगम, कलाकार व कलारसिक या दोघांच्याहिसाठी एक अनोखी पर्वणी मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

art
वाहतूकदारांनाे! जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन आज जाणार आहात? हे वाचा
art
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
art
Satara: अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिका-यांची 'ती' ध्वनीचित्रफीत जूनी
art
Korea Open: किदांबी श्रीकांतने गाठली कोरिया ओपन बॅडमिंटनची उपांत्य फेरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com