वाहतूकदारांनाे! जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन आज जाणार आहात? हे वाचा

हा बदल फक्त आज पुरता असणार आहे.
transport vehicle
transport vehiclesaam tv

मावळ : कार्ल्यात (karla) एकविरा देवीच्या (ekvira devi) यात्रेनिमित्त होणारी वाहनांची गर्दी बघता लोणावळा ग्रामीण पोलीसांनी (police) जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील (old pune banglore highway) अवघड वाहतूक बंद (heavy vehicle) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी व स्थानिकांनी प्रशासनाला आजच्या दिवशी (ता. ८ एप्रिल, शुक्रवार) सहकार्य करावे असे आवाहन लोणावळा (lonavala) ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे. (ekvira devi karla latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कार्ला फाटा ते ग्रीन फिल्ड चौक, ग्रीन फिल्ड चौक ते गडावरील पार्किंग आणि पायथा रस्ता येथे नो व्हेईकल झोन. मुंबई- पुणे व पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा कुसगाव टोल ते वडगाव फाटा दरम्यान अवजड मोठ्या वाहनांना नो एंट्री घोषित केली आहे. हा बदल फक्त आज पुरता असणार आहे.

transport vehicle
Maharashtra Kesari: बाला रफिकचा पराभव; दिग्गज मल्लांत आज उपांत्य फेरीची लढत

दोन वर्षानंतर देवीची यात्रा भरणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तासंतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागू नये याकरिता बदल करण्यात आला आहे. भाविकांनी व स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

transport vehicle
Maval: घरावर दगडफेक करुन चाेरट्यानं चंदनाचे झाड पळविले; वडेस्वरचे २ शेतकरी जखमी
transport vehicle
Satara: अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिका-यांची 'ती' ध्वनीचित्रफीत जूनी
transport vehicle
Korea Open: किदांबी श्रीकांतने गाठली कोरिया ओपन बॅडमिंटनची उपांत्य फेरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com