Satara: अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिका-यांची 'ती' ध्वनीचित्रफीत जूनी

तथापि सद्यस्थितीत POS मशीन वर लाभार्थींचे फिंगर प्रिंट घेणे बंधनकारक आहे, त्याशिवाय धान्य वाटप करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
shekhar sinh
shekhar sinhsaam tv
Published On

सातारा : सध्या व्हॉटस्अँप, फेसबुक अशा विविध समाज माध्यमांमध्ये (social media) कोरोना (corona) काळातील म्हणजेच मार्च २०२० या कालावधीतील जिल्हाधिकारी सातारा (satara) यांची धान्य वाटपाबाबतची जुनी ध्वनीचित्रफितीचा प्रसार होत आहे. ही ध्वनीचित्रफीत जुनी असल्यामुळे सद्यस्थितीत त्यातील घोषणा गृहीत धरणेत येऊ नये असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी नागरिकांना केला आहे. (satara latest marathi news)

shekhar sinh
Satara: शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवा; राजधानी साता-यात वृषालीराजे आक्रमक

या ध्वनी चित्रफितीमध्ये केशरी शिधापत्रिका धारक (प्राधान्य कुंटूब योजना कार्डधारक) यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रति व्यक्ती प्रति माह 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू दिला जातो. या सोबत आता प्राधान्य कुंटूब योजना व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो तांदुळ प्रति महिना माहे एप्रिल, मे व जुन महिन्यात मोफत देणेत येणार असलेबाबत सांगितलेले आहे.

परंतु 31 मार्च 2022 चे सद्यस्थितीत प्राधान्य कुटुंब कार्ड धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रति व्यक्ती 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू दिली जाते. या सोबत आता प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति माह 2 किलो तांदुळ व 3 किलो गहू प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत माहे सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत देय आहे.

shekhar sinh
Kokan: रत्नागिरीत श्रीरंगीया कोंकनेन्सिस फुलवनस्पतीचा लागला शोध

ध्वनीचित्रफितीमध्ये सन 2020-21 कालावधीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार होत होता. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानातील POS मशीन वर लाभार्थीचे फिंगर प्रिंटची गरज नसलेबाबत व फिंगर प्रिंट घेणेत येऊ नये अशी घोषणा करणेत आलेली होती. तथापि सद्यस्थितीत POS मशीन वर लाभार्थींचे फिंगर प्रिंट घेणे बंधनकारक आहे, त्याशिवाय धान्य वाटप करता येणार नाही. या ध्वनीचित्रफितीत तत्कालीन तुरडाळ नियतन आदेश येणार असल्याचे सांगितले आहे तथापि 31 मार्च 2022 च्या सद्यस्थितीत डाळी बाबतीत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त नाहीत असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी नमूद केले आहे. तरी नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shekhar sinh
World Cup: स्मृती मानधनाला बाद करण्यासाठी ट्रायॉनची अप्रतिम डाईव्ह (व्हिडिओ पहा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com