Crime
Crime SaamTVNews

Maval: घरावर दगडफेक करुन चाेरट्यानं चंदनाचे झाड पळविले; वडेस्वरचे २ शेतकरी जखमी

वडगाव पोलिसांनी अज्ञात विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
Published on

मावळ : मावळ (maval) मधील वडेस्वर येथील शेतक-याच्या (farmer) घराचे दरवाजे बंद करून दहा ते बारा जणांनी दगडफेक करत धारदार शस्त्रांचा धाक दाखवून शेतक-याने तीस वर्षापासून स्वत:च्या मुलाप्रमाणे जपलेल्या चंदनाचे झाड तोडून चोरून नेल्याची घटना आंदरमावळातील वडेश्वर येथे घडली. महेश शिंगारे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे सुरेश शिंगारे आणि त्यांचे वडील या दगडफेकीत जखमी (injured) झाले आहेत. या बाबत वडगाव पोलिस (police) ठाण्यात त्यांनी तक्रार नाेंदवली आहे. (maval latest marathi news)

याबाबत मिळालेली माहिती अशी : मावळातील वडेश्वर ठोकळवाडी येथील धरणाजवळ शिंगारे राहतात. तीस वर्षांपूर्वी घरासमोर चंदनाचे रोपटे लावले होते. त्याला जीवापाड सांभाळत ते मोठे केले. रात्री दोनच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळके त्या ठिकाणी आली. त्यांनी शिंगारे यांच्या घराबाहेर लागलेल्या मोटारसायकलचा प्लग वायरी व टेम्पोची बॅटरी काढली. त्यानंतर कटरच्या साह्याने झाड तोडण्यास सुरवात केली.

Crime
Crime: भोसरीत कोयता गँगचा दाेघांवर हल्ला; १८ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

दरम्यान माेठा आवाज आल्यावर शिंगारे ओरडले व सर्वांना जागं करण्याचे प्रयत्न केला. ताेपर्यंत समाेरुन दगडफेक सुरू झाली. प्रतिकार करण्यासाठी जात असताना दोघांना दगडं लागली. त्यामुळे पुन्हा दाेघे भीतीने घरात गेले. चोरट्यांनी दरवाजा बंद करून धाक दाखवून झाड मुळापासून तोडून नेले. वडगाव पोलिसांनी अज्ञात विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Crime
Junnar: गृहमंत्र्यांकडे तक्रार हाेताच पुणे ग्रामीण पोलीसांनी चार जणांना पकडले
Crime
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार
Crime
Nanded: राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच : देवेंद्र फडणवीस
Crime
Salute: गावातील पहिल्या महिला फौजीची कापूसखेडकरांनी केले जंगी स्वागत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com