Salute: गावातील पहिल्या महिला फौजीची कापूसखेडकरांनी केले जंगी स्वागत

गावात ठिकठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला.
villagers from khapuskhed welcomed snehal kharade
villagers from khapuskhed welcomed snehal kharadesaam tv

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा (walva) तालुक्यातील कापूसखेड (khapuskhed) गावची कन्या स्रेहल कृष्णा खराडे (snehal Kharade) हिची बिहार (bihar) येथे सशस्त्र सीमा बल (एस.एस.बी) दलात निवड झाली आहे. राजस्थान येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रथमच गावात आल्यानंतर स्नेहलची गावातून धूमधडाक्यात मिरवणूक काढत उत्साही स्वागत करण्यात आले. कापूसखेड तसेच परिसरातून पहिली महिला फौजी (soldier) होण्याचा मान स्नेहलने मिळवला आहे. (snehal kharade latest marathi news)

स्नेहलचे वडील कृष्णा हे शेतकरी (farmer) असून आई संगिता या गृहिणी आहेत. खराडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. स्नेहलचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आई -वडिलांची मुलीने सैन्यात भरती व्हावे अशी इच्छा होती. स्नेहलने पालकांची इच्छा पुर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम घेतले.

villagers from khapuskhed welcomed snehal kharade
World Cup: अलायसा हिलीनं केल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा

तिने सैन्य दलात भरती हाेण्यासाठीचा अर्ज दाखल केला. त्यादिवासापासून ती स्वस्थ बसली नाही. गावातील मैदानावर तसेच इस्लामपूर येथे तिने मैदानी सराव केला. त्यानंतर परीक्षा दिली. तीन महिन्यांपुर्वी तिला प्रशिक्षणासाठी पत्र आले होते. ती राजस्थानला (rajasthan) प्रशिक्षणासाठी रवाना झाली. हे प्रशिक्षण पूर्ण हाेताच ती प्रथमच कापूसखेड येथे आली होती. यावेळी ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता. त्यांनी स्नेहलची गावातून मिरवणूक काढली. गावात ठिकठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. आई वडीलांनी कष्टातून मला मोठे केले आहे. त्यांच्या पुण्याईमुळे मला आज देशसेवा करता येणार असल्याचे स्नेहल खराडेनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

snehal kharade
snehal kharadesaam tv
villagers from khapuskhed welcomed snehal kharade
Satara: हेच का अच्छे दिन? माेदी-शहांचा निषेध नाेंदवत युवा सेनेचा थाळी नाद
villagers from khapuskhed welcomed snehal kharade
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com