Satara, Covid 19
Satara, Covid 19 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Covid -19 Update : घाबरु नका, काळजी घ्या ! साता-यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, मास्क वापरण्याचे आवाहन

ओंकार कदम

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल 52 रुग्णांना कोरोनाची लागण (satara covid 19 marathi news) झाली. त्यातील उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Breaking Marathi News)

सातारा जिल्ह्यात आज दुपारी 12 पर्यंत सरासरी रुग्णांच्या तपासणी अंती 25 टक्के जणांना काेविड 19 ची लागण झाल्याची नाेंद आहे. आज दुपारी 12 पर्यंत काेराेनाची लागण झालेल्या 45 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दरम्यान काेराेनाची लागण झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाढती रुग्ण संख्या आटाेक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

जिल्ह्यातील बँक, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनr मास्कचा दैनंदिन वापर करण्याच्या सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी स्वतः हून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन शल्य चिकीत्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT