Maratha Seva Sangh News : सर्व मंदिर भटमुक्त व्हावीत, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापासून आंदाेलन तीव्र करु : पुरुषोत्तम खेडेकर

या मंदिरांमध्ये मंडल आयाेगानूसार बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी असेही खेडेकरांनी नमूद केले.
Purushottam Khedkar, Buldhana, Maratha Seva Sangh News
Purushottam Khedkar, Buldhana, Maratha Seva Sangh Newssaam tv
Published On

Buldhana News : छत्रपतींच्या घराण्यातील संयोगिताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांच्यासोबत नाशकात (nashik kalaram mandir) जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघाने (Maratha Seva Sangh) केला आहे. या संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) म्हणाले राज्यातील मंदिरातून ब्राह्मण पुजारी हटवा अशी आमची मागणी आहे. (Breaking Marathi News)

Purushottam Khedkar, Buldhana, Maratha Seva Sangh News
Chhatrapati Sambhajiraje News: शिंदे- फडणवीसांत नैतिकता असेल तर 'त्या' मगरुर मंत्र्याचा राजीनामा घेतील : संभाजीराजे छत्रपती

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुराणक्य वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाने आज त्यांची भूमिका बुलढाणा (buldhana) येथे जाहीर केली. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरोषत्तम खेडेकर म्हणाले राज्यातील सर्व मंदिर भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयकरण करा. ज्या प्रमाणे पंढरपूरातील मंदिर ब्राह्मणमुक्त आहे त्याचपद्धतीने सर्व मंदिरांत हे लागू व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.

Purushottam Khedkar, Buldhana, Maratha Seva Sangh News
Baramati News : गाेळीबाराने बारामती हादरले ! दाेघे जखमी, ग्रामस्थांनी धाडसाने एकास धरले; ज्वेलर्सवरील संकट टळले

या मंदिरांमध्ये मंडल आयाेगानूसार बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी असेही खेडेकरांनी नमूद केले. तर तेथील पैसा गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येईल. खेडेकर म्हणाले ही आमची आजची भुमिका नाही. काेल्हापूरातील महालक्षीचे मंदिर (kolhapur ambabai temple) भटमुक्त हाेण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आंदाेलन घेतले आहे. त्याची तीव्रता पुढच्या काऴात वाढू शकेल असेही खेडेकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com