Heat Wave In Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Heat Wave In Maharashtra : उष्माघातामुळे कनेरगावातील 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (पाहा व्हिडिओ)

नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री, टाेपी, पाण्याची बाटली साेबत घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- संदीप नागरे

Heat Wave In Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाच्या चटक्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आजारी पडू लागली आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. राज्यात जळगाव (jalgoan) आणि हिंगाेली (hingoli) जिल्ह्यात कडक उन्हामुळे दाेघांचा मृत्यू झाल्याची घटना समाेर आली आहे. (Maharashtra News)

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांना उन्हाची झळ बसू लागली आहे. राज्यातील नांदेड (nanded) , अमरावती (amravati), हिंगाेली (hingoli) ठाणे (thane), साेलापूर (solapur), सातारा (satara), वर्धा (wardha), पुणे (pune), जळगाव (jalgoan) आदी जिल्ह्यात पारा 40 पेक्षा अधिक असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक आजारी पडू लागले आहेत. जळगावातील शेतक-याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हिंगाेली जिल्ह्यात एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

हिंगाेली येथील कनेरगावातील नंदिनी शंकर खंदारे या पाच वर्षाच्या चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालयातून मिळाली. तिला उलटी, जूलाब असा त्रास हाेत हाेता. तिला रुग्णालयात आणले असता तिचा मृत्यू झाला. यामुळे खंदारे कुटुंबावर दुखाचा डाेंगर काेसळला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT