MPSC Result : डीवायएसपी बनण्याचे स्वप्न साकार, 'एमपीएससी' त टेम्पो ड्रायव्हरचा मुलगा सलग दुस-यांदा राज्यात प्रथम

प्रमाेद चाैगुलेंनी पालकांचे स्वप्न सत्यात उतरविल्याने त्यांचे गावात काैतुक हाेत आहे.
pramod chougule, mpsc result, sangli, nashik
pramod chougule, mpsc result, sangli, nashiksaam tv
Published On

MPSC Result : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्तायादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सांगली (sangli) प्रमोद चौगुलेंनी (mpsc result pramod chougule) ६३३ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांच्यासह २० पदांच्या ४०५ जागांसाठी ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रमाेद चाैगुले यांनी राज्यात सलग दुस-यांदा पहिला क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकाविला आहे.

pramod chougule, mpsc result, sangli, nashik
Saam Impact : जल जीवन मिशन भ्रष्टाचार प्रकरण; जिल्हा परिषदेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांना शिस्तभंगाची नाेटीस

नाशिक येथे उद्योग उपसंचालक या पदावर कार्यरत असलेले प्रमाेद चाैगुले हे मिरज तालुक्यातील सोनी गावचे. गेल्या सात वर्षांपासून कामाच्या निमित्ताने चौगुले कुटुंब सांगलीत स्थायिक आहे. (Maharashtra News)

प्रमोद चौगुले यांचं शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यामंदिर आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व वालचंद कॉलेज मधून झाले. आई-वडिलांचा ध्येय एकच होते मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून प्रमोद यांच्या आई-वडिलांनी कधी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.

pramod chougule, mpsc result, sangli, nashik
Sangli : काय सांगता ! 'या' ज्वारीला मिळताेय तीनशे रुपये प्रति किलो दर

प्रमाेद यांचे वडील टेम्पो चालवितात. आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. सन 2020 मध्ये प्रमोद चौगुले यांनी एमपीएससीत पहिल्या येण्याचा बहुमान मिळविला होता. त्यानंतर त्यांची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.

नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. मात्र त्यांना पोलीस विभागात जायचं होतं. त्यामुळे त्यांनी 2021 मध्ये पुन्हा एमपीएससीच्या परीक्षा दिली. त्यात ते पुन्हा राज्यात पाहिले आले आहेत. आता त्यांची डीवायएसपी म्हणून निवड होणार आहे. सलग दाेन वेळा एमपीएससीची परीक्षा देऊन प्रमाेद चाैगुलेंनी त्यांच्या पालकांचे आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरविल्याने त्यांचे गावात काैतुक हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com