माणूसकीला काळीमा फासणारी घटना; गतिमंद तरुणीवर दोन वृद्ध नराधमांचा, आळीपाळीने लैंगिक अत्याचार! Saam Tv
महाराष्ट्र

माणूसकीला काळीमा फासणारी घटना; गतिमंद तरुणीवर दोन वृद्ध नराधमांचा, आळीपाळीने लैंगिक अत्याचार!

वासनांध शेख इलियास शेख सत्तार आणि चांद खां रहीम खां या दोघांविरुध्द नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: 19 वर्षीय गतिमंद तरुणीवर दोन जणांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायना समोर आली आहे. ही घटना काल 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चिखली तालुक्यामधील अमडापूर (Amdapur) येथे घडली आहे. (Two old men sexually abused a young woman)

हे देखील पहा-

पीडित तरुणीच्या (victimized) आईने दिलेल्या तक्रारीवरून शेख इलियास शेख सत्तार(57) व चांद खां रहीम खां (55) दोघेही नराधम रा. अमडापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन नराधमांच्या मुलीच्या वयाच्या असणाऱ्या या तरुणींवरती त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याने ही घटना वासनांध झालेल्या शेख इलियास शेख सत्तार (Sheikh Ilyas Sheikh Sattar) आणि चांद खां रहीम (Chand Khan Rahim) खां या दोघांविरुध्द नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारीनुसार पीडितेची आई दुपारी शेतात काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून शेख इलियास आणि चांद खां मुलीच्या घरात घुसले. दोघांनी बळजबरी आळीपाळीने (Alternately) तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीची आई घरी आल्याचे कळताच दोघा आरोपींनी तेथून पळ काढला. दोन्ही आरोपींवर अमडापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोनवणे करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT