सांगलीमध्ये विहिरी शेजारी खेळताना बालकाचा दुर्दैवी मृत्यू!
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj) तालुक्यातील टाकळी (Takali) यवथील आंबेडकर नगर (AmbedkarNagar) मधील आरुण शंकर दोडमनी ह्या चार वर्षांच्या बालकांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. अरुण हा आपला मोठा भाऊ व आणखी दोन मित्रांच्या सोबत मासे पकडण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या सुरगोंडा पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ गेला होता पावसाने या विहिराला पाणी भरपूर आले आहे.(Death of a child in Sangli)
हे देखील पहा-
विहिरीच्या काठाला बसून काठीला दोरी बांधून मासे पकडण्याचा ही चार बालके खेळ खेळत होती यावेळी विहिरीत तोल जाऊन अरुण पडला यावेळी सोबत असलेला मोठा भाऊ व दोन मित्र घाबरून घरी पळून गेले घरात गेल्यानंतर त्यांनी अरुण विहिरीत पडल्याची माहिती दिली.
मात्र तो पर्यंत खूप वेळ झाला होता यावेळी विहिरीत उतरून स्थानिक नागरिकांनी अरुणचा मृतदेह बाहेर काढला. ग्रामीण पोलिसांनी (Rural police) घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनला पाठवला आहे.या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.