prithviraj chavan, shantling swami, solapur news  saam tv
महाराष्ट्र

Childrens Passed Away : निरागस मुलांनी संपवली जीवन यात्रा, पाेलीस कुटुंबियांसह शेतमजूरांना धक्का

Solapur Crime News : या दाेन्ही घटनांमधील मुलांच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचे जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. एका घटनेत पाेलीस हवालादाराच्या मुलाचा समावेश आहे. तर दुस-या घटनेत शेतमुजर कुटुंबातील मुलाचा समावेश आहे. पाेलीस या दाेन्ही घटनांची कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या

सोलापुरात पोलिस हवालदार असलेल्या पित्याच्या १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण (prithviraj ganpatsingh chavan) असे मुलाचे नाव आहे. त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

पृथ्वीराज हा आपल्या कुटुंबासमवेत अरविंदधाम वसाहतीमध्ये ब्रह्मपुत्रा इमारत क्रमांक १५ मधील रूम नंबर ४२ मध्ये राहत होता. त्याचे वडील शहर पोलिस मुख्यालयात हवालदार आहेत. काल दुपारी तो घरात नातेवाइकांना बेशुद्धावस्थेत आढळून आला.

फौजदार चावडीचे पोलिस नाईक कामूर्ती यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

आई रागविल्याने निंबर्गीत मुलाची आत्महत्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गीतील तरुणाने आईने रागावल्याने मुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांतलिंग गुरुलिंगय्या स्वामी असे आत्महत्या केलेल्या १७ वर्षीय मुलाचे नाव आहे.

शांतलिंग स्वामी याचे आई-वडील शेतमजुरी करतात. घरकुल मंजूर झाल्याने त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे स्वामी कुटुंब शेजारील बसवराज कोळी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात.

शांतलिंग स्वामी हा आजारी असल्याने आईने रागावून दवाखान्याला जाण्यास सांगितले. मात्र मी दवाखान्यात जाणार नाही. मी आंघोळीला बाहेर जातो म्हणून तो रागारागाने घरातून निघून गेला.

उशीर झाला तरी शांतलिंग परत न आल्याने आईने मोठा मुलगा बसवराज यांस फोन करून सांगितले. त्यानंतर त्यांनी शोध घेतला.ते व्हा जवळच असलेल्या मल्लिकार्जुन शेतसंदी यांच्या जुन्या घरात तो त्याने बेशुद्ध अवस्थेत आढळला.

बसवराजने ओरडून शांतलिंगच्या आईला बोलावले. त्यानंतर आई, आजी आणि इतरांनी त्याला तातडीने मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. मंद्रूप पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT