Hingoli and buldhana  Saam tv
महाराष्ट्र

Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

hingoli car Accident update : राज्यात अपघात सत्र सुरुच आहे. हिंगोलीत नरसी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची मिळत आहे.

Vishal Gangurde

संदिप नागरे, संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

हिंगोली : राज्यात अपघात सत्र सुरुच आहे. हिंगोलीत नरसी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची मिळत आहे. या अपघातात महिलेसह दोघे ठार झाले आहेत. तर बुलडाण्यातही एसटी आणि खासगी बसच्या धडकेत एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत शनिवारी नरसी मार्गावर भरधाव कार रस्त्याच्या खाली असलेल्या झाडाला आदळली. त्यानंतर झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अनिरुद्ध तानाजी वानखडे व अर्चना सुभाष वानखडे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथून उमरखेडकडे जाताना हिंगोलीच्या नरसी जवळ हा अपघात झाला. या अपघातामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे.

बुलडाण्यात एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात

बुलडाण्यातही एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ४४ प्रवाशांनी भरलेली बस ही बुलडाण्यातून निघाली होती. त्यानंतर चिखली ते मेहेकर रोडवरील नांद्री फाट्याजवळ या एसटी बसला खासगी बसने धडक दिली.

या एसटी आणि खासगी बसच्या अपघातात एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना मेहेकर येथील सामान्य रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं आहे.

खासगी बस ही मेहेकरला जात होती. स्लीपर कोच बस असल्याने त्यातील झोपलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT