Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Akola Car Accident Update : अकोल्यातील पातूरमधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले.
Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अकोल्यातील पातूरमधील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण ठार झाले. तर काही जण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये सरनाईक कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे सरनाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमरावतीमधील शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. वाशिमवरून अकोल्याकडे जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडी धडकली.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार
Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातात किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोल्यातील आसटूल गावातील दोघांचा मृत्यू झाला. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिता आमले आणि इतर काही जण गंभीर जखमी झाले. या अपघातामधील जखमींना अकोल्यात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

या अपघातानंतर तातडीने पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. अपघातानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. सध्या पोलिसांनी अपघाती वाहन रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केलं आहे.

या अपघातात रघुवीर अरुण सरनाईक (२८), अस्मिता अजिंक्य आमले (९), शिवानी अजिंक्य आमले (३०), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३५), अमोल शंकर ठाकरे (३५), कपिल प्रकाश इंगळे यांचा मृत्यू झाला. तर पियुष देशमुख (११) वर्ष, सपना देशमुख (४१), श्रेयस सिद्धार्थ (४१) हे जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पातूर पोलीस करत आहे.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार
Nanded Accident: नांदेडमध्ये भरधाव ट्रकने ८ दुचाकी चिरडल्या, अपघातामध्ये दोघे ठार

चारपदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर आल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com