Water Supply, Satara, Satara Muncipal Council saam tv
महाराष्ट्र

Satara News : सातारा पालिका पाणीपूरवठा : शनिवार, गुरुवार पेठेत पाण्याचा ठणठणाट; जाणून घ्या कारण

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन सातारा पालिका प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

Satara News : सातारा शहरातील शाहू उद्यान परिसरातील पाण्याची टाकीतून हाेणारा पाणीपूरवठा आज (बुधवार) तांत्रिक कारणास्तव हाेऊ शकला नाही. त्यामुळे शनिवार पेठेसह गुरुवार पेठेतील काही भागांत आज पाणीपूरवठा (satara water supply news) झाला नाही. परिणामी सलग दाेन दिवस पाणी न मिळाल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. (Maharashtra News)

पावसाळ्यात सातारकरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सातारा पालिकेने आठवड्यातून एक दिवस कास आणि शहापूर पाणीपूरवठ्यात कपात (satara water cut news) केली आहे. त्याची अंमलबजावणी महिन्यापुर्वीपासून सुरु आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पालिकेकडून एक दिवस पाणीपूरवठा केला जात नाही.

त्यानूसार मंगळवारी गुरुवार पेठेतील शाहू उद्यान परिसरातील (shahu udayan) पाण्याच्या टाकीतून केला जाणार पाणी पूरवठा केला गेला नाही. आज (बुधवार) सकाळच्या सुमारास शाहू उद्यान परिसरातील पाण्याच्या टाकीतून केला जाणार पूरवठा तांत्रिक कारणास्तव हाेऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना सलग दाेन दिवस पाणी मिळाले नाही. परिणामी नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

सातारा पालिकेच्या (satara muncipal council news) पाणीपूरवठा विभागाने दिलेल्या माहितीनूसार आजचा पूरवठा हा पंपींगमध्ये आलेल्या अडचणींमुळे हाेऊ शकला नाही. नागरिकांना पाणी पूरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन सातारा पालिका प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT