two bulls passed away three farmers injured due to electric shock  Saam Digital
महाराष्ट्र

Satara: विजेचा शॉक लागून बैलांचा मृत्यू, शेतकरी जखमी; सातारा महावितरण कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा

two bulls passed away three farmers injured due to electric shock : या घटनेची माहिती कळताच पाेलिस आणि महावितरण कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ओंकार कदम

सातारा तालुक्यातील वेचले गावात विद्युत डीपीचा शॉक लागून 2 बैलांचा मृत्यू झाला तर बैलगाडीमधील तिघे जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर विद्युत विभागावर ग्रामस्थ संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

वेचले गावात आज सकाळच्या सुमारास सोयाबीन पेरणीसाठी काही शेतकरी बैलगाडीतून निघाले हाेते. त्यावेळी अचानक बैलांना विद्युत झटका लागला आणि बैलं जागेवरच खाली पडली. या बैलगाडीमधील शेतकरी देखील जखमी झाले.

त्यानंतर घटनास्थळी जमाव जमला. काही ग्रामस्थांनी घटनेची माहिती पाेलिसांनी तसेच महावितरण कार्यालयास दिली. दरम्यान या घटनेचा जाब विचारात महावितरणच्या कारभारा विरोधात वेचले ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. महावितरणने शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वेळ प्रसंगी महावितरण कार्यालय जाळून टाकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी महावितरण कार्यालयाला दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT