Dress Code To Tuljapur Temple 
महाराष्ट्र

Tuljapur Temple: ड्रेस कोड लागू करायचा की नाही? पुजारी मंडळ आणि महाराष्ट्र मंदिर महासंघात जुंपली

Dress Code To Tuljapur Temple: तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याच्या मागणीवर पुजारी मंडळ आणि महाराष्ट्र मंदीर महासंघात जुंपलीय.

Bharat Jadhav

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

देशातील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. राज्यातील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येऊ लागलाय. मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. आता तुळजापूरमधील भवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीवरून मंदिर पुजारी आणि महाराष्ट्र मंदिर महासंघात वाद जुंपल्याचं दिसत आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून मंदिर संस्थानकडे करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाने विरोध केलाय. तुळजाभवानी देवीच्या कुलाचार पूजेसाठी भाविक येतात. तोकडे कपडे कोणी घालत नाही, त्यामुळे वेगळ्या ड्रेस कोडची गरज नाहीये, अशी भूमिका पाळीकर पुजारी मंडळाने केलीय. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षनासाठी देवीच्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडुन निवेदनद्वारे मंदिर संस्थानकडे वस्त्रसंहिता लागू करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाने विरोध केला. मंदिरात कोणीही तोकड्या कपड्यात येत नाही. त्यामुळे मंदिर महासंघाने केलेली मागणी तर्कहीन असल्याचही पुजारी मंडळाने म्हटलंय. येथे येणारा कोणताही भक्त हा कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी येतो, येथे कोणीही छोटे कपडे घालून येत नाही. चांगल्या कपड्यामध्येच भाविक येत असतात. त्यामुळे येथे ड्रेस कोड लागू करण्याची गरज नाही असं.

आपण मंदिर महासंघाच्या अध्यक्षांना मंदिर परिसरात दोन तास निरीक्षण करण्यास सांगितलं होतं. या निरीक्षणात त्यांनी पाहावं की, कोणी तोडक्या कपड्यांमध्ये येत आहे का? परंतु येथे कोणीही छोट्या कपड्यात येत नाही, त्यामुळे ड्रेस कोड लागू करण्याची गरज नाहीये, असं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणालेत.

तर महाराष्ट्र मंदिर महासंघाने धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावे यासाठी निवेदन दिलंय. देशातील अनेक देवस्थानांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आलाय. त्यानुसार तुळजापूर मंदिरातही ते नियम लावण्यात यावा. याआधीही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला होता, पण काही कारणाने तो रद्द करण्यात आला होता. आता परत ड्रेसकोड लागू करण्यात यावा,यासाठी निवेदन देण्यात आल्याचं महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य किशोर गंगणे म्हणालेत.

डिसेंबर २०२४ मध्येच वृंदावनातील बांके बिहारी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. याअंतर्गत भाविकांनी लहान कपडे, हाफ पँट आणि चामड्याचा पट्टा घालून ठाकूर बांके बिहारी मंदिरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले. पुरी, ओडिशा येथील जगन्नाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. काही दिवसापूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT