FDA officials conduct raids on illegal gutkha and tobacco units during a statewide crackdown led by Tukaram Mundhe. saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

Tukaram Mundhe FDA Crackdown On Gutkha Mafia Maharashtra; अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी 19 दिवसांच्या कालावधीत शेकडो आस्थापनांवर छापे टाकले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर बंदी असलेल्या अन्नपदार्थांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. 25 मे 2026 ते 12 जून 2026 या अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत शेकडो आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, FDA ने दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या दहा वर्षांत उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार अशा एकूण 703 जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच्या तुलनेत मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही दिवसांत राज्यभर व्यापक स्वरूपात कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे.

राज्यभरातील कारवाईचा आढावा

25 मे ते 12 जून या कालावधीत राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण 355 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 343 ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आले. या कारवाईदरम्यान सुमारे 3 कोटी 27 लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 235 आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात

मुंबई विभागात सर्वाधिक धडक

मुंबई विभागात 68 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. सर्वच ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने 23.98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 43 गुन्हे दाखल करून 72 जणांना अटक करण्यात आली. तसेच 63 आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आणि 14.15 लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली.

कोकण विभागात 138 जणांना अटक

कोकण विभागात 138 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 136 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. येथे 24.02 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 63 गुन्हे दाखल करून 138 जणांना अटक करण्यात आली. 125 दुकाने सील करण्यात आली असून 5.90 लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली.

पुणे विभागात मोठा मुद्देमाल जप्त

पुणे विभागात 65 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 63 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून 38.27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 54 गुन्हे दाखल करून 67 जणांना अटक करण्यात आली. 59 आस्थापने सील करण्यात आली असून 9.30 लाख रुपयांची चार वाहने जप्त करण्यात आली.

नाशिक विभागात सर्वाधिक मूल्याचा मुद्देमाल

नाशिक विभागात 22 आस्थापनांपैकी 21 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. येथे 1 कोटी 29 लाख 79 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, जो राज्यातील सर्वाधिक आहे. 21 गुन्हे दाखल, 21 अटक, 18 दुकाने सील आणि 16.10 लाख रुपयांची चार वाहने जप्त करण्यात आली.

संभाजीनगर विभागात 71 लाखांचा मुद्देमाल

छत्रपती संभाजीनगर विभागात 27 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 20 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले. 71.46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 19 गुन्हे दाखल, 17 अटक, 9 आस्थापने सील आणि 76.50 लाख रुपयांची 9 वाहने जप्त करण्यात आली.

नागपूर व अमरावती विभागातही मोठी कारवाई

नागपूर विभागात 21 पैकी 21 आस्थापनांमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले. 23.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 21 गुन्हे दाखल आणि 21 अटक करण्यात आली. मात्र येथे कोणतेही दुकान सील किंवा वाहन जप्त करण्यात आले नाही.

अमरावती विभागात 14 पैकी 14 आस्थापनांमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळले. 16.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 14 गुन्हे दाखल, 14 अटक आणि 12 लाख रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली. FDA च्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षांत 260 उत्पादक, 248 पुरवठादार आणि 190 वाहतूकदार अशा एकूण 703 जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 19 दिवसांत 350 अटक, 235 गुन्हे, 274 सील कारवाया आणि 30 वाहन जप्ती अशा मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने राज्यातील गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साखळीविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारामागील संघटित साखळी मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला असून, उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि विक्रेत्यांविरुद्ध आणखी व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Crime: जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस, प्रणित मोरे, डॉ. सेजल पवारनं लाज आणली

अयोध्येच्या राम मंदिरातून 5 कोटींची चोरी, प्रभू श्रीरामाचे करोडो रुपये चोरीला, जाब विचारण्यासाठी ठाकरेसेना अयोध्येला जाणार

Skin Care: प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज अन् फंगल इन्फेक्शनचा त्रास होतोय? डॉक्टरांनी सांगितले ७ घरगुती सोपे उपाय

महाराष्ट्रावर दुष्काळाचं महासंकट? 1950 नंतरचा महाभंयकर 'एल निनो'? हाहाकार माजणार, बळीराजा कोलमडणार?

SCROLL FOR NEXT