अमर रहे... अमर रहे! विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गावात येताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर

Kolhapur Soldier Martyred : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळ कर्तव्य बजावताना भारतीय लष्कराचे जवान विक्रम चव्हाण यांना वीर मरण आले. आज कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Kolhapur Soldier Martyred :
MARTYR VIKRAM CHAVAN LAID TO REST WITH FULL HONOURS, EMOTIONAL FAREWELL IN KOLHAPUR VILLAGEsaam tv
Published On
Summary
  • गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण यांना उरीतील कमालकोट येथे वीरमरण आले.

  • सीमारेषेजवळ गस्त घालत असताना ग्रॅनाईट स्फोटात त्यांचा मृत्यू झाला.

  • त्यांच्या पार्थिवावर गोंडोली गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे जवान विक्रम चव्हाण यांना कमालकोट येथे वीरमरण आले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांच्या पार्थिवावर आज गोंडोली या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूरहून सैन्य दलाच्या वाहनातून जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांचे पार्थिव गोंडोली गावात दाखल झाले. जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव गावात येताच त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

वीर जवान विक्रम चव्हाण गेल्या नऊ वर्षापासून भारत मातेची सेवा करत होते. जम्मू काश्मीर येथील उरी येथील कमालकोट या ठिकाणी कर्तव्यावर असताना विक्रम चव्हाण यांना वीरमरण आले. कमालकोट येथील सीमारेषेजवळ गस्त घालत असताना ग्रॅनाईटच्या स्फोटात त्यांना वीरमरण आले होते.

आज त्यांचे पार्थिवावर कोल्हापूरमधील गोंडोली मूळ गावी आणण्यात आले. पार्थिव गावी दाखल होताच त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. विक्रम चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

जवान विक्रम चव्हाण यांच्या अंतयात्रेत सामील झालेल्या लोकांनी अमर रहे... अमर रहे... विक्रम चव्हाण अमर रहे.. वीर जवान तुझे सलाम. असा जयघोष करत विक्रम चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली.

वीर जवान विक्रम चव्हाण यांची अंतयात्रा तुरुकवाडी ते गोंडोलीपर्यंत फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

विक्रम चव्हाण यांच्या पश्चात पत्नी रूपाली विक्रम चव्हाण आणि दोन वर्षाची वीरा मुलगी, भाऊ सागर, तीन विवाहित बहिणी, आणि वडील बाळकृष्ण गणपती चव्हाण असा मोठा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com