Truck Drivers Strike Saam Digital
महाराष्ट्र

Truck Drivers Strike: ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, नवी मुंबईत पोलिसांना मारहाण

Truck Drivers Strike: नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईत ट्रकचालकांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Sandeep Gawade

Truck Drivers Strike

रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे याठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईत ट्रकचालकांनी पोलिसांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बेलापूर उरण, सायन पनवेल आणि उरण जेएनपीटी मार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला यात पोलिसांनी मध्यस्थी करत मार्ग मोकळा केला. मात्र ट्रक चालकांच्या आक्रमक आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.

वाहनाने अपघात घडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला आहे. यामध्ये 7 लाख रुपयांचा दंड व दहा वर्ष कारावासाची तरतूद आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरलेत. बीडसह आष्टीमध्ये या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करावा, अन्यथा चक्काजामचा इशारा आता वाहनचालकांनी दिला आहे. या मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चालकांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंधन तुटवड्याचं संकट

सरकारने बनवलेल्या नव्या अपघात वाहन कायद्याविरोधात टँकर चालक आणि वाहतूकदार आक्रमक झाले असून पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक आणि वाहतूकदार आजपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकसह राज्यावर इंधन तुटवड्याचं संकट ओढवलं आहे.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनचालक आक्रमक

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहने अडवून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर मोठ्या संख्येने वाहन चालक एकत्र आले होते. हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याअंतर्गत वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी असून जिल्हा मोटार वाहक व मालवाहतूक असोसिएशन संघटनेने संप पुकारला आहे. यावेळी सरकारच्या या नव्या कायद्याचा वाहन चालकांनी केला निषेध केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT