Raj Thackeray Meeting In Aurangabad On 1st May
Raj Thackeray Meeting In Aurangabad On 1st May Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; 6 हजार पोलिस, 720 SRPF जवानांसह चोख सुरक्षा

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: येत्या १ मे ला राज ठाकरे यांच्या सभेसाठी औरंगाबादच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अद्यापही औरंगाबाद पोलिसांची सभेसाठी परवानगी मिळाली नसली तरी सभेला (Meeting) परवानगी मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील घरोघरी, गल्लीबोळात जाऊन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला येण्याचे आवाहन केलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी पाहता सुरक्षाव्यवस्था चोख केली जात आहे. औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असा जवळपास 6 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. यात 3 डीसीपी, 6 एसीपी, 30 पीआय, 300 एपीआय, पीएसआय आणि जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. (Triumphant preparation for Raj Thackeray's meeting; Tight security with 6 thousand police and 720 SRPF guards)

हे देखील पाहा -

राज ठाकरे यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी SRPF च्या 6 तुकड्या 30 एप्रिलला औरंगाबादेत दाखल होणार. एसआरपीएफच्या एका तुकडीत 120 जवान असतात, अशा सहा तुकड्या म्हणजे एकूण 720 SRPF जवान याठिकाणी तैनात असणार आहेत. त्याशिवाय औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. औरंगाबाद, जालना येथील राज्य राखीव टीमची गरज पडल्यास इतर जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासह सीआयडीच्या विशेष पथकाचे सभेवर, त्याआधी आणि त्यानंतरही लक्ष असणार आहे.

मनसैनिकांकडून सभेची जोरदार तयारी

राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेच्या वतीने सायकलीवरून प्रचार केला जाणार आहे. त्यासाठी विशेष सायकली तयार करण्यात आल्या आहेत. यावर राज ठाकरे यांच्या सभेसाठी असलेले पोस्टर लावण्यात आलेत. या सायकली औरंगाबाद शहरातील प्रत्येक गल्लीत जाऊन प्रत्येक घरासमोर सभेला येण्याचा आवाहन करणार आहेत, सोबतचं मनसेची एक निमंत्रण पत्रिका सुद्धा देणार आहेत.

भोंग्यांचं राजकारण तापणार?

१ मे ला होणारी राज ठाकरेंची सभा आधीच चर्चेत आहे. कारण सध्या त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राजकारण तापलं आहे. त्यात राज ठाकरे भोंग्यांबाबत पुन्हा भाष्य करु शकतात, त्यामुळे ही सभा वादग्रस्त ठरु शकते. १ मे रविवारी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे सायंकाळी ५:३० वाजता ही सभा होणार आहे. या सभेला मात्र शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांनी विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, राज ठाकरेंच्या सभेमुळे राज्यात तणाव निर्माण होऊन अशांतता किंवा दंगली घडू शकतात. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी त्यांनी केली होती. शिवाय राज ठाकरेंच्या या सभेला पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळाली नाही, मात्र मनसे या सभेसाठी आक्रमक आहे.

२ एप्रिलच्या सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे?

२ एप्रिलच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export News | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

Lipstick Hacks: ओठांवर लिपस्टिक जास्त वेळ टिकावी असं वाटतंय? वापरा या टीप्स

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे काही तासांपासून कुणालाच का भेटले नाहीत? नेमकं कारण काय?

Today's Marathi News Live : वर्षा गायकवाड या नसीम खान यांच्या भेटीला

WhatsApp News : या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन, वेळीच थांबा

SCROLL FOR NEXT