आम्हाला घरचं जेवण द्या; तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याची विनंती

सत्र न्यायालयात याचिका दाखल
Ravi Rana
Ravi RanaSaam Tv
Published On

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कारागृहात त्यांना घरी बनवलेले जेवण मिळावे, यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या अडचणी आणखीनच वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली होती. तुरुंगामध्ये पाणी देखील दिले गेले नसल्याचे, आरोप (Allegations) देखील त्यांनी लावले आहेत. यानंतर मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन राणा यांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.

हे देखील पाहा-

राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन (Court) कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. यामध्ये राज्य सरकार त्यांची बाजू मांडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घरचे जेवण मिळावे, याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. राणा दाम्पत्याच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. नवनती राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक करण्यात आली होती. यानंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Ravi Rana
राणा दाम्पत्याबाबत व्हिडीओ बॉम्ब फुटणार, शिवसेना खासदाराचा गौप्यस्फोट

यानंतर राणा दाम्पत्याने त्यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेले एफआयर फेटाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, चुकीचे वक्तव्य याविषयी गुन्हा दाखल केले आहेत. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम देखील लावण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com